शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतर आदिवासी शेतकऱ्याला मिळाला न्याय

By admin | Updated: August 7, 2015 01:58 IST

शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली.

महाराष्ट्र महसूल प्राधिकरण व तहसीलकडून मिळाली १६ एकर जमीन परतकारंजा (घाडगे): शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली. यावर शेतकऱ्याच्या मुलाने शेतीचा ताबा मिळविण्याकरिता तहसीलदार व महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे धाव घेतली. यावर निर्णय देत सदर शेती शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयानुसार अखेर ३० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्तात त्याच्या जमिनीचा ताबा देण्यात आला.या बाबत थोडक्यात वृत्त असे की, फेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम (७५) यांची ब्राम्हणवाडा शिवारात १६.९४ एकर शेती होती. ही शेती याच गावातील सोमा इंगळे, भीमराव तेलमोरे, जीजा तेलमोरे, वेणूबाई दाभणे या चार गैरआदिवासी शेतकऱ्यांनी, शासनाची पूर्व परवानगी न काढता विकत घेतली होती. ही जमीन परत मिळावी म्हणून देविदास श्रीरामे यांनी कारंजा तहसीलला अर्ज केला होता. या विरोधात, गैरअर्जदार महाराष्ट्र प्राधिकरण नागपूरकडे अपीलात गेले. तेव्हा महासूल प्राधिकरणाने तहसीलच्या निकालाला स्थगनादेश देवून तहसीलदारांना फेर चौकशीचे आदेश दिले. कारंजा तहसीलदारांनी आदिवासी शेतकरी श्रीराम यांना शेती परत मिळण्यात यावी, अशी शिफारस केली. त्या शिफारसीनुसार प्राधिकरणाने स्थगनादेश हटवून जमीन मुळ आदिवासी शेतकरी देविदास श्रीराम यांना परत देण्यात यावी, असा आदेश काढून प्रकरण निकाली काढले, त्या आदेशानुसार १७ जुलैला श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला.आदिवासीची जमीन विशेष परवानगी काढल्या शिवाय, कुणालाही विकत घेता येत नाही. असे असताना हा व्यवहार झाला होेता. तब्बल तीस वर्षानंतर या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन परत देण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाद्वारे देण्यात आला. त्यानुसार तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार गणेश बर्वे, कातोरे आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात मुळ मालक देवीदास श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला. तीस वर्षानंतर का होईना, न्याय मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)परवानगी नसताना झाला शेती विक्रीचा व्यवहारफेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम यांची मौजा ब्राम्हणवाडा येथील १६.९४ एकर जमीन येथील चार गैरआदिवासींनी कोणतीही पूर्व परवानगी न काढता ३० वर्षांपूर्वी विकत घेतली होती. हा व्यवहार अंधारात ठेवत झाल्याची तक्रार सदर शेतकऱ्याच्या मुलाने तहसीलदारांसह महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे केली. यावर चौकशी होवून शेती सदर शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. यानुसार पोलीस बंदोबस्तात ही शेती मुळ शेतकऱ्याना परत करण्यात आली.