शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये केली २५ लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मास्क तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रुपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर मास्क अनिवार्य ठरले.

ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पुढाकार : आठ तालुक्यातील महिला बचत गटांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : करोनाच्या टाळेबंदीच्या काळात वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी मास्क शिवून त्यातून २५ लाखांची उलाढाल केल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मास्क तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रुपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर मास्क अनिवार्य ठरले. सर्वत्र तुटवडा जाणवायला लागला. आवश्यक असणाऱ्या आरोग्य यंत्रणेस मास्कची चणचण जाणवायला लागल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांना जिल्ह्यातील बचतगटांची आठवण झाली. बचत गटाच्या पदाधिकाºयाशी चर्चा झाल्यावर महिलांनी आव्हान स्वीकारले. प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत गटातील महिला वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत. मास्क तयार करण्याचा अनुभव अनेकांना नव्हता. पण टाळेबंदीमुळे घरातील पुरूषांचा रोजगार संपलेला व बचतगटाचे कामही ठप्प पडले असल्याने महिलांनी मास्क तयार करण्याचे तंत्र शिकून घेत शिवणयंत्रही शोधली. दिवसातील दहा तास शिवणयंत्र घरघरू लागली.आठही तालुक्यातील बचतगटांनी लागेल तसा पुरवठा सुरू केला. कापडाची दुकाने बंद असल्याने हे काम ठप्प पडत असण्याची स्थिती आल्यावर वर्धा शहर कपडा लाईन संघटनेने तत्परतेने माफक दरात पाहिजे तेवढे कापड उपलब्ध करून दिल्याची माहिती उमेद अभियानाच्या व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांनी दिली. आरोग्य खात्याचे विविध विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत तसेच स्वयंसेवी संस्थांना पुरवठा करण्यात आला.वीस ते पंचवीस रुपये दराने उत्पादन खर्चावर आधारित विक्री झाल्याचे विपणन व्यवस्थापक मनिष कावडे यांनी सांगितले. करोनाच्या संकटात हातपाय गळून बसलेल्या अनेक गावात या गटांनी ऊर्जा आणली. जिल्ह्यातील बचतगट अनेक बाबतीत राज्यात आघाडीवर राहिले आहे. मास्कच्या व्यवसायातसुध्दा महिलांनी चांगली कामगिरी बजावल्याचे वानखेडे यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटूंब घरातच बसून होते. घर कसे चालणार ही चिंता असतांनाच मास्कचा व्यवसाय हाती आल्याने प्रश्न मिटला. प्रत्येकीला तीनशे रुपये रोज पडला. सरकारची गरजही भागली. व आम्हीही सावरलो, अशी भावना जीवन्नोनती महिला बचतगटाच्या अध्यक्ष संगिता गायकवाड यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटाने पापड, लोणचे आदी पदार्थ तयार करून ते मोठ्या कार्पोरेट कंपन्याच्या थाटात विकले. त्यातून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग त्यांनी शोधला.

टॅग्स :Womenमहिला