मदुुराई एक्स्पे्रसने २०१ मजुरांचे वर्ध्यात होणार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:34+5:30

लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्याकरिता शासनाने मार्ग मोकळा करुन दिला. आधी महाराष्ट्रात अडकेलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले तर आता इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही परत आणण्याची व्यवस्था केली आहे. तामिळनाडू येथून निघालेल्या मधुराई एक्सपे्रसमध्ये महाराष्ट्रातील १ हजार ३५८ मजुरांचा समावेश आहे.

201 workers to arrive in Wardha by Madurai Express | मदुुराई एक्स्पे्रसने २०१ मजुरांचे वर्ध्यात होणार आगमन

मदुुराई एक्स्पे्रसने २०१ मजुरांचे वर्ध्यात होणार आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून तयारी : आठ जिल्ह्यातील मजुरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परराज्यात अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे तामिळनाडू येथून मदुुराई एक्स्पे्रसने निघालेल्या वर्ध्यासह अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या आठ जिल्ह्यातील २०१ मजुरांचे सोमवारी सांयकाळी ५ वाजता वर्ध्याच्या मुख्य रेल्वेस्थानकावर आगमण होणार आहे. बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्याकरिता शासनाने मार्ग मोकळा करुन दिला. आधी महाराष्ट्रात अडकेलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले तर आता इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही परत आणण्याची व्यवस्था केली आहे. तामिळनाडू येथून निघालेल्या मधुराई एक्सपे्रसमध्ये महाराष्ट्रातील १ हजार ३५८ मजुरांचा समावेश आहे. ही एक्सपे्रस पुणे, मनमाड, परभणी व वर्धा या चार ठिकणी थांबा घेणार आहे. या ठिकाणी लगतच्या जिल्ह्यातील मजुरांना उतरवून तेथून त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून तेथील जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वर्ध्यात सोमवारी सायंकाळी ही एक्सपे्रस येणार असून २०१ मजूर उतरणार आहे. त्यामध्ये वर्धा अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोेंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांचा समावेश आहे. वर्ध्यात आल्यानंतर या सर्व मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याकरिता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेकरिता रविवारी रेल्वेस्थानकाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

दहा बसेसची केली व्यवस्था
सोमवारी सायंकाळी मधुराई एक्सपे्रसने वर्ध्याच्या मुख्य रेल्वेस्थानकावर येणाºया २०१ मजुरांची आधी आरोग्य पथकाकडून तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्रत्येकी एक तर नागपूर व गोंदियाकरिता प्रत्येकी दोन बसचा समावेश आहे. लांबच्या प्रवासावरुन आलेल्या या मजुरांची भोजनाचीही व्यवस्था प्रशासनाकडून केली आहे. आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांची नोंदणी करुन बसमध्ये बसविण्यात येईल. सोशल डिस्टंन्सिग पाळून बसमध्ये आसन व्यवस्था केली असून त्यांच्या आसनावरच भोजनाची बॉक्स ठेवलेले असणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार मधुराई एक्सपे्रसने वर्ध्यात येणाºया २०१ मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्याकरिता दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्ध्यातीलही मजुरांचा समावेश असून त्यांची तपासणी करुन त्यांना असलेल्या लक्षणावरुन संस्थात्मक किंवा होम क्वारंटाईन केले जाईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

Web Title: 201 workers to arrive in Wardha by Madurai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.