118 found positive on the same day | एकाच दिवशी आढळले ११८ पॉझिटिव्ह

एकाच दिवशी आढळले ११८ पॉझिटिव्ह

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू : ६५ रुग्णांची कोविडला धोबीपछाड दिल्याने रुग्णालयातून मिळाली सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शुक्रवारी ५४३ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाल प्राप्त झाले. त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर आज चार कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे असले तरी शुक्रवारी ६५ व्यक्तींनी कोविड-१९ ला हरविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्यातील १७ पुरुष तर चार महिला आणि समुद्रपूर तालुक्यातील दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृतकांमध्ये सेलू येथील ६९ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० आणि ८० वर्षीय पुरुष आणि हिंगणघाट येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

३७ अहवालाची प्रतीक्षा
शुक्रवारी ५३४ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यावर त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाच संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर सध्या ३७ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे.
५३४ व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीला
शुक्रवारी ५३४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे.

Web Title: 118 found positive on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.