शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०.५७ लाख हिंदू तर ५३ हजार मुस्लीम

By admin | Updated: August 28, 2015 02:14 IST

शासनाच्यावतीने २००१ मध्ये जनगनना करण्यात आली होती. यानंतर २०११ मध्ये जनगनना करणे गरजेचे होते;

धर्म आधारित लोकसंख्या जाहीर : बौद्ध धर्मियांची संख्या १.७५ लाख तर साडेपाच हजार जैन धर्मीयप्रशांत हेलोंडे  वर्धाशासनाच्यावतीने २००१ मध्ये जनगनना करण्यात आली होती. यानंतर २०११ मध्ये जनगनना करणे गरजेचे होते; पण त्यास विलंब झाला. २०११ च्या धर्तीवर देशात जनगनना करण्यात आली. यातील आकडेवारी गतवर्षी जाहीर करण्यात आली होती. बुधवारी केंद्र शासनाकडून धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील एकूण १३ लाख ७७४ या लोकसंख्येपैकी १०.५७ लाख एवढी संख्या हिंदू धर्मियांची असून ५३ हजार एवढी लोकसंख्या मुस्लिमांची असल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख ७७४ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात हिंदू धर्मियांची संख्या १० लाख ५७ हजार ९६ नोंदविण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या बौद्ध धर्मियांची १ लाख ७५ हजार ४१७ असून मुस्लीम धर्मियांची संख्या ५३ हजार ८५४ आहे. त्या खालोखाल जैन धर्मियांची संख्या ५ हजार ६६३ असून ख्रिश्चन धर्मिय २ हजार ६९६ तर शीख धर्मिय २ हजार १४७ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शासनाने केलेल्या जनगननेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २५४ नागरिकांनी आपला धर्म सांगण्यास नकार दिला तर १ हजार ६४७ नागरिकांनी आपला धर्मच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे या ३ हजार ९०१ नागरिकांच्या धर्माची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. शासनाच्या धर्माधारित जनगननेमुळे जिल्ह्यातील सर्वधर्मियांची आकडेवारी स्पष्ट झाली आहे.