समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:18 IST2025-08-12T19:14:36+5:302025-08-12T19:18:56+5:30

Yogi Adityanath News: समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Samajwadi Party and Lohshahi are two banks of the river, Yogi Adityanath's criticism | समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका

समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका

समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जोरदार टीका केली आहे. समाजवादी पार्टीच्या सत्ताकाळात व्यापाऱ्यांवर झालेला अन्याय, गुंडा टॅक्स आदींची आठवण काढत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचा लोकशाहीवर असलेला विश्वाह हा केवळ देखावा आहे, असा टोला लगावला. तसेच संभल, बहराइच आणि गोरखपूरमधील सपाच्या नकारात्मक राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना योदी आदित्यनाथ त्यांचा उल्लेख एक ज्येष्ठ नेते असा  करत म्हणाले की, काही लोक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत आहेत. माता प्रसाद पांडेय जी तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला अनावश्यकरीत्या मोहरा बनवून काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत आहेत. तुम्ही असं होऊ देता कामा नये, असे आवाहन केले.

गोरखपूर वारसा कॉरिडॉरच्या मुद्यावरून समाजवादी पार्टी नकारात्मक आणि विकासविरोधी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच गोरखपूर वारसा कॉरिडॉरबाबत सविस्तर माहिती दिली. सपाच्या कार्यकाळात या भागामध्ये कुठलंही विकासकाम झाला नाही, असा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात व्यापाऱ्यांना भीती आणि गुंडा टॅक्सचा सामना करावा लागत असे, त्यामुळे गोरखपूरमधील व्यापाऱ्यांनी माता प्रसाद पांडेय यांच्या दौऱ्याला विरोध केला होता, अशा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला. 

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी  समाजवादी पक्षाचं सरकार सत्तेत असतताना झालेल्या नग्न तांडवाचाही उल्लेख केला. तसेच सध्याचं सरकार तिथे शुद्धिकरणाचं अभियान राबवत असल्याचे सांगितले. सपाने संभलमध्ये जी नकारात्मक पसरवली होती तिच्यामध्ये आता आम्ही सुधारणा करत आहोत. मात्र समाजवादी पक्ष आपल्या जुन्या खोडी न सोडता विकासामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही योगींनी केला.

संभल असो, बहराइच असो वा गोरखपूर असो सपा प्रत्येक ठिकाणी नकारात्मक राजकारण करते. भाजपा आणि एनडीएचं सरकार विकास करू इच्छित आहे मात्र सपाला हे सहन होत नाही आहे, असा टोलाही योगींनी लगावला.  

Web Title: Samajwadi Party and Lohshahi are two banks of the river, Yogi Adityanath's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.