शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

परितेवाडी शाळेत ऑनलाइन शिकण्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:27 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देशाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का?

- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा

तुम्हांला माहितीय का, आमच्या परितेवाडीच्या शाळेतील मुलांचे मित्र जगभरात विखुरलेले आहेत. तब्बल 14क् पेक्षा जास्त देशांत या मुलांचे मित्र आहेत. आणि बघायला गेल तर या मुलांनी क्वचितच त्याचं गाव सोडलं आहे, तेही मामाच्या गावाला जायचं असेल तर. आताच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा ते त्यांच्या परदेशी मित्रंशी बोलतात, मस्त गप्पा मारतात. आणि हो त्यांना इंग्रजी बोलता येत नाही बर. हिंदी आणि मराठी समजतं आमच्या शाळेतील मुलांना. आश्चर्य आहे ना!! याचं कारण म्हणजे या मुलांना मोबाईलचा वापर करून नवनवीन बाबी शिकून घेण्याची सवय लागली आहे. भाषेचा अडथळा  येत नाही कारण ही मुले ट्रान्सलेटर नावाचं ऐप वापरतात. ज्यामुळे समोरच्याची भाषा जरी वेगळी असली तरी यांना हिंदी मध्ये ऐकू येत. किती भारीय न हे. कधी कधी गंमत म्हणून ही मुल परदेशी भाषेतील एक दोन शब्द शिकून घेतात.  त्यांना आपल्या जेवणाचा डब्बा दाखवतात  आणि पदाथार्ची नावे  सांगतात. त्यांना जे आवडत  ते करतात. एकमेकांना भेटकार्ड सुद्धा पाठवतात.  या ऑनलाईन   शाळेमुळे ते घर आणि घरातील माणसे आता जवळ आली आहेत. एकमेकांच्या मदतीने नवीन काही न काही शिकत राहतात. आपल गाव, आपली शाळा याच्या पलीकडेही जग आहे. ते जग अनुभवायचे असेल तर ऑनलाईन   शाळेत जायलाच हव. बघा प्रय} करून एखादा मित्र आहे का तुमच्याशी मैत्री करायला तयार. तुमची अन त्याची गट्टी समजली कि मला नक्की कळवा.