शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर औषध नाहीये अजून, मग लोक बरे कसे होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 07:10 IST

लक्षात ठेवायचं की शंभरातले 97 लोक बरे होऊन घरी जातात. 

ठळक मुद्देआपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी. 

कोरोनावर लस किंवा औषधं तयार झाली नाहीत तरीही काही लोक बरे होत आहेत ते कसे? - क्षितीज कांबळे, नांदेड

तुझा प्रश्न अगदी महत्वाचा आहे क्षितिज. कोरोनावर अजून कुठलंही विशिष्ठ औषध उपलब्ध नाही आणि कोरोनाला प्रतिबंध करणारी लसही नाही. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा?्या लोकांचा दर साधारण 3 टक्के आहे. म्हणजे 100 लोकांना जर कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातले 3 लोक  मरण पावतात आणि 97 लोक बरे होऊन घरी परत जातात. मग आता प्रश्न पडतो तो हा की हे 97 टक्के लोक कसे काय बरे होतात?तर  प्रामुख्याने त्यांच्यात असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे. आपल्या शरीरावर जेव्हा कोरोना किंवा इतर विषाणूंचा हल्ला होतो तेव्हा या बाहेरून शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीराने एक यंत्रणा उभारलेली असते. त्याला आपण म्हणतो आपली रोगप्रतिकारक शक्ती. तू हे शाळेत विज्ञानात शिकलाच असशील. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी. ती कशी चांगली ठेवता येईल बरं?तर फळं, भाज्या खाल्ल्या पाहिजेत. चौफेर आहार घेतला पाहिजे. जंक फूड कमी केलं पाहिजे. पुरेशी झोप झाली पाहिजे. घरातल्या घरात का होईना पण पुरेसा व्यायाम हालचाली व्हायला हव्यात. हे सगळं केलं की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जे लोक बरे झाले आहेत , एकतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. दुसरं म्हणजे या आजारात जी लक्षण दिसतात त्यावर सध्यातरी औषधं दिली जात आहेत. म्हणजे ताप असेल तर ताप कमी करणा?्या गोळ्या, सर्दी आणि घशाच्या त्रसावर औषधं दिली जात आहेत. लक्षण कमी झाली की लोक बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे आपण घाबरायचं नाही. चांगलं चुंगलं खायचं, व्यायाम करायचा आणि सर्दी खोकला ताप यातलं काहीही जाणवलं तर आपल्या नेहमीच्या डॉक्टरांशी बोलायचं. कोरोना झाला म्हणून लपवून ठेवायचं नाही. उलट लक्षात ठेवायचं की शंभरातले 97 लोक बरे होऊन घरी जातात.