शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

हा डबल हवाहवाई  व्यायाम केलाय कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:09 IST

करा तुमचे पाय बळकट आणि मग बघा तुम्ही कसे ताठ चालायला लागाल ते!

ठळक मुद्देसाइड स्क्वॉट्स

आता रोज तुम्ही व्यायाम करताय. नक्की करताय ना?एखाद दिवस दांडी मारली तर हरकत नाही, पण शक्यतो, आठवडय़ाचे किमान पाच दिवस व्यायाम झालाच पाहिजे, अशी सवय स्वत:ला लावा. खूप व्यायाम करायची गरज नाही, पण आपल्या शरीराला व्यायामाची सवय मात्र नक्कीच पाहिजे. ही सवय एकदा का तुम्हाला लागली, की मग तुम्हालाच स्वस्थ बसवणार नाही. पण लक्षात ठेवा, व्यायामाच्या बाबतीत अति करायचं नाही, तसंच मध्येच सोडूनही द्यायचं नाही. कारण ही चांगली सवय आहे, शिवाय आपल्या आयुष्यात त्याचा खूप आणि प्रत्येक गोष्टीसाठी उपयोग होतो. आपली शक्ती वाढते, उत्साह वाढतो, आपली आजारपणं कमी होतात.त्यामुळे शक्यतो, व्यायाम चुकू द्यायचा नाही, पण आठवडय़ातून एक दिवस व्यायामाला सुटीही द्यायची. इतर वेळी थोडा का होईना, आपल्याला आवडेल तो व्यायाम जरूर करायचा. आज आपण शिकू या आणखी एक नवा व्यायाम. पायांचा. हेदेखील स्क्वॉट्सच आहेत, पण थोडे वेगळे आणि याची डिफिकल्टी लेवल किंचित अवघडही आहे. आपल्या आजच्या व्यायामाचं नाव आहे, ‘साइड स्क्वॉट्स’!

कसा कराल हा व्यायाम?1- सरळ उभे राहा.2- दोन पायांत थोडं अंतर घ्या. 3- मागे मी तुम्हाला सांगितलं होतं हवेत बसायला, तसं हवेत दोन सेकंद बसायचं.4- हे करताना पाठ ताठ ठेवायची.5- एकदा हवेत बसून झालं की पुन्हा सरळ मुळ स्थितीवर यायचं.6- एकदा एक पाऊल उजीवकडे सरकवून हवेत बसायचं, नंतर मुळ स्थितीत येऊन पुन्हा डावीकडे एक पाऊल सरकून हवेत बसायचं.7- असं सुरुवातीला दहा वेळेस करा.काय होईल या व्यायामानं?1- नेहेमीच्या स्क्वॉट्सपेक्षा हे वेगळे आहेत आणि याचा फायदाही जास्त आहेत.2- यामुळे तुमचं ढू आणि मांडय़ांचे स्नायू बळकट होतील.3- मांडय़ांच्या बाहेरच्या बाजूंत ताकद येण्यासाठी तर यांचा खूप उपयोग होतो.4- यामुळे छान कार्डिओ एक्सरसाईज होतो.5- हृदय बळकट होतं. करा तुमचे पाय बळकट आणि मग बघा तुम्ही कसे ताठ चालायला लागाल ते!- तुमचीच ‘डबल हवाहवाई’, ऊर्जा