घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 07:00 IST2020-05-12T07:00:00+5:302020-05-12T07:00:07+5:30

घरबसल्या आकाशातून फेरफटका मारायचा असेल, तर तुम्हाला खूप ऑनलाईन रस्ते उपलब्ध आहेत! - ही घ्या यादी!

lockdown - DIY - sky view- stargazing on apps. stay at home activity. | घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !

घरबसल्या आकाशातले तारे पाहा, अगदी जवळून !

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

आकाशातले तारे बघत बसायला तुम्हाला आवडतं का? कधीतरी आईबाबांनी शुक्राची चांदणी दाखवली की कुतूहल वाटतं का? मंगळावर पाणी असेल का? परजीवी खरंच असतील का? आपल्यासारखं दुसऱ्या  एखाद्या ग्रहावर माणूस असेल का? जीव असेल का? आपला त्यांच्याशी संपर्क होईल का असे प्रश्न तुम्हाला आभाळाकडे बघून पडतात?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष आकाश, त्यातले डोळ्यांना एरवी न दिसणारे तारे आणि ग्रह बघू शकता. कसे? ह्या घ्या काही युक्त्या-
1. त्यासाठी तुम्हाला sky view  हे एप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही संपूर्ण आकाश आणि त्यातले ग्रह तारे सहज बघू शकता. 
2.  NASA  या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथेही तुम्हाला अवकाशाची, ग्रहताऱ्यांचे सुंदर फोटो बघायला मिळतील. रोजच्या रोज काढलेले फोटोही तिथे अपलोड केलेले असतात जे तुम्ही बघू शकता. 
3. आपल्या ISRO च्या साईटवर गेलात तर तुम्हाला भारताची स्पेस मिशन्स, स्पेसक्राफ्ट्स, लॉन्चर्स यांचीही डिटेल माहिती आणि फोटो वाचता, बघता येतील. 


4. theskylive नावाची एक वेबसाईट आहे. तिथे प्रत्येक क्षणाला स्पेसमध्ये काय काय सुरु आहे याचे तपशील वाचायला मिळतात. रोजच्या स्पेस न्यूज तिथे असतात. शिवाय आपल्या आकाशगंगेचा 3डी व्ह्यू बघता येतो. ग्रह, लघु ग्रह, धूमकेतू यांचेही रोजच्या रोज अपडेट्स वाचायला मिळतात. रोजच्या रोज सूर्य आणि चंद्र कसे दिसताहेत हे बघायला मिळतं. आणि रात्रीचं आकासह कसं बघायचं, याच्याही महत्वाच्या टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या असतात. 
- आहे की नाही धमाल. नुसतं आभाळाकडे बघत बसण्यापेक्षा समजून घेत बघितलं तर तुम्हालाही खूप खूप मज्जा येईल. 

Web Title: lockdown - DIY - sky view- stargazing on apps. stay at home activity.