शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एक कोपरा घरातला , कह दो ये हमारा  है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:30 AM

घरातच एक जागा शोधा, आणि घाला तिथे काय पसारा घालायचा तो!!

ठळक मुद्देएक खास कोपरा

 घरात सगळीकडे पसारा करू नको रे!’- हे वाक्य तुम्ही आजवर किती वेळा ऐकलंय? रोज किमान दोनदा? आता आपण कुठेही बसून काहीतरी खेळलो, किंवा एखादं हस्तकलेचं काम केलं किंवा चित्र रंगवलं किंवा इतर काहीही केलं की तिथे आपोआपच पसारा होतो. तो काही आपण मुद्दाम करत नाही. पण तो होतो तर खरंच. अर्थात तो पसारा आहे असं आईबाबांचं म्हणणं असतं. आपल्या दृष्टीने तो खेळ किंवा रंगच असतात. पण ते बरोब्बर कोणाच्या तरी पायाने सांडतात आणि मग चारही बाजूंनी आपल्या नावाने आरडाओरडा होतो. त्यावर उपाय काय? तर आपलं काम किंवा खेळणं झाल्याबरोब्बर तो सो कॉल्ड पसारा उचलून टाकायचा, सगळं सामान आवरून ठेवायचं आणि ती जागा स्वच्छ चकाचक करून ठेवायची. हे! हे! हे! काहीही !!! जमणार आहे का आपल्याला? तर नाही! मग काय रोज बोलणी खायची? तर तेही नाही! मग करायचं काय?

तर आपल्या घरात आपला स्वत:चा असा एक कोपरा बनवायचा आणि सगळा पसारा तिथेच घालायचा. पण, तो कोपरा काही साधासुधा ठेवायचा नाही. तो कोपरा मस्त डेकोरेट करायचा. हा कोपरा हॉलमधला असू शकतो, गॅलरीतील असू शकतो किंवा कुठलाही असू शकतो. तो आधी मस्त तुम्हाला पाहिजे तसा डेकोरेट करा. त्यासाठी तिथे तुमच्या नेहेमी लागणा?्या वस्तू नीट रचून ठेवा. एखादी मस्त झाडाची कुंडी ठेवा. एखादं छोटं शेल्फ जर तुम्हाला मिळालं तर त्यात तुमच्या वस्तू ठेवा. आणि मग तुमच्या सगळ्या गोष्टी तिथेच बसून करा. पण तो कोपरा असा भारी डेकोरेट करा की त्याकडे बघून मोठ्या माणसांना पण तिथे येऊन बसावसं वाटलं पाहिजे. कारण किती झालं तरी   ‘आपण आपण आहोत’ . काय?