शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चूल कशी  पेटवतात ? -माहितीये  का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:06 IST

तुम्ही खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!

ठळक मुद्दे .. आज पेटवा चूल!

मान्य आहे की बाहेर भयंकर ऊन आहे. हेही खरंय की सॉलिड उकडतंय. पण तरी बहुतेक ठिकाणी रात्री तर मस्त गार होतं. खरं म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की वारं सुटतं आणि मग दिवसभराचा उकाडा आणि तगमग जरा कमी होते. अशी वेळ झाली की आपण जायचं थेट अंगणात नाही तर गच्चीत. तीन विटा गोळा करायच्या, लाकडं गोळा करायची, लाकडाचा भुसा किंवा बारीक काड्या गोळा करायच्या, ज्यातून हवा घालता येईल अशी फुंकणी शोधायची, ही फुंकणी शक्यतो धातूची शोधायची, घरात रॉकेल असेल तर ते थोडं मागायचं, काड्यापेटी घ्यायची..  एवढी तयारी तुम्ही केलीत की तुमचा नेमका काय उद्योग चाललाय यावर लक्ष ठेवायला एक तरी मोठा माणूस येईलच. त्यांना येऊ दे. आपल्याला त्यांची मदत लागणार आहे. आणि जर कोणी मोठं आपणहून आलं नाही तर आपण जायचं आणि एखाद्या मोठ्या माणसाला बोलावून आणायचं. कारण आपल्याला पेटवायची आहे, चूल!तीच तीच. शहरातली मुलं फक्त मराठीच्या पुस्तकात वाचतात ती चूल. ती कशी मांडायची आणि कशी पेटवायची याचं तंत्र असतं. ते मोठ्या माणसांना माहिती असतं. खाली जाड लाकडं रचायची, त्यावर बारीक काड्या रचायच्या आणि त्यावर कोळसा ठेवायचा. या सगळ्याला थोडं रॉकेल शिंपडायचं म्हणजे चूल लौकर पेटते. मग काड्यापेटीने पेपरची गुंडाळी आणि पेपरने चूल पेटवायची. पहिला जाळ आणि धूर होऊन गेला की मग त्यात फक्त निखारे धगधगत राहतात. तोवर थांबायचं. घाई करायची नाही. आणि एकदा का ते नुसते निखारे पेटते राहिले की त्यात कांदे, बटाट्याच्या चकत्या, वांगी, खोब?्याच्या वाट्या, मक्याचं कणीस असले पदार्थ भाजायला ठेवायचे. आणि मग, सुमारे अध्र्या तासाने खरपूस भाजले गेलेले ते पदार्थ, तिथेच बसून, त्याच्यावरची काजळी झटकून तिखट मीठ लावून खाऊन टाकायचे.फक्त हे सगळं सुरु करण्याच्या पूर्वी शेजारी पाण्याच्या दोन मोठ्या बदल्या भरून ठेवायला विसरायचं नाही आणि सगळं खाऊन झाल्याच्या नंतर चुलीतली धग पूर्ण गेल्याशिवाय तिथून हलायचं नाही. कारण मजा करायची, पण सुरक्षित राहून!- आता तुम्ही जर का खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!