शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सात कचऱ्याच्या ट्रकची परेड आणि एक गिफ्ट बॅग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:38 IST

वाढदिवसाची आगळी वेगळी भेट

आपल्याकडे घंटागाडी आल्यावर आपण काय करतो. घराच्या बाहेर येतो आणि कचरा देतो. किती साधं उत्तर. पण लास वेगासमधील हेंडरसन या शहरातली  लिना रिले ही छोटीशी मुलगी मात्र तिथल्या  गार्बेज ट्रक वर आणि त्यातील कामगारांवर खूप प्रेम करते. तो ट्रक कचरा उचलायला आला  की लिनाला आवाज येतो. ती खिडकीतून डोकावते. मग ती आणि तिची आई त्या ट्रकजवळ जातात आणि   ट्रकमधल्या कामगारांना बिस्कीटं, कुकीज सारखा खाऊ देतात. आता तर लिनाला याची सवयच लागली आहे. कधी जर घरात खाऊ नसेल तर  तिची आई तिला,  ‘ आपल्याकडे खाऊ   नाहीये त्यांना द्यायला  ‘ हे सांगते तेव्हा लिनाला खूप वाईट वाटतं. ती रडते आणि त्या निळ्या ट्रकला आपण काही खायला द्यायलाच हवं असा हट्ट करते. लिनाच्या आईला लिनाचा हा हट्ट माहिती असल्यामुळे  निळ्या ट्रकमधल्या या स्वच्छता कामगारांसाठी लिनाच्या घरात रोज खाऊ असतोच. तीन वर्षाची छोटीशी मुलगी आपल्यावर इतकं प्रेम करते हे पाहून हे स्वच्छता कामगारांनाही खूप छान वाटतं.

  तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिनाला सरप्राइज द्यायचं ठरवलं. त्यांनी लिनाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या  दिवशी  सकाळी  ते सरप्राईज दिलं. नेहेमीप्रमाणो गाडी येण्याच्या वेळेस लिना खिडकीत उभी होती. एकामागून एक अशा सात  कच:याचे निळे ट्रक तिच्या घरासमोर उभ्या राहिले. त्यातली सर्वात पहिला ट्रक छान फुलांनी सजवलेला होता. आणि त्यावर हॅपी बर्थडे    लिना असं लिहिलं होतं. हे पाहून लिनाच्या आईला खूप आनंद झाला. लिना आणि तिची आई आभार माऩण्यासठी  आणि नेहेमीचा खाऊ देण्यासाठी त्या ट्रकजवळ  गेल्या. तेव्हा त्यातील कामगारांनी लिनाला एक गिफ्टची बॅग दिली. त्यात तिच्यासाठी चित्रकलेची वही , रंग , हॅट आणि कॉफी मग होता. आपल्याला हे मिळालेलं गिफ्ट बघून लिनाला खूपच आनंद झाला. लिनाला मिळालेल्या या आगळ्या वेगळ्या सरप्राईजमुळे लिनाच्या आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले.