बदकासारखं फताड्या पायाने चालण्याचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:12 PM2020-05-25T16:12:59+5:302020-05-25T16:14:34+5:30

डक वॉक

Exercise at home- duck walk exercise- stay at home | बदकासारखं फताड्या पायाने चालण्याचा व्यायाम

बदकासारखं फताड्या पायाने चालण्याचा व्यायाम

googlenewsNext
ठळक मुद्दे या व्यायामानं फक्त पायांचाच नाही, इतरही अनेक प्रकारचा उत्तम व्यायाम आपल्या शरीराला घडतो.


बदक हा पक्षी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ब:याच लहानमोठय़ा पाणवठय़ांच्या ठिकाणी हा आपल्याला सहज दिसतो. 
कसा असतो तो? कसा दिसतो? चालतो? बदकाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, तो शरीरानं तसा स्थूल असतो. त्याची मान आणि पाय आखूड असतात. त्याला फार जोरानं पळता येत नाही. त्याचे पायही फताडे असतात. या फताडय़ा आणि फेंगडय़ा पायांनीच तो डुलत डुलत चालतो. चालताना क्वॅकùù क्वॅकùùù आवाज करत जातो.
दिसायला हा पक्षी जरा स्थूल असला, हळूहळू चालत असला, तरी त्याचा व्यायाम मात्र जबरदस्त असतो. म्हणजे तो जसा चालतो, तसं चालून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या व्यायामात किती दम आहे ते!
या व्यायामाचं नाव आहे ‘डक वॉक’ अर्थात बदकाची चाल!


खरं तर हा व्यायाम प्रकार म्हणजे एक प्रकारचे स्क्वॉट्सच आहेत. पण या व्यायामानं फक्त पायांचाच नाही, इतरही अनेक प्रकारचा उत्तम व्यायाम आपल्या शरीराला घडतो.
कसा कराल हा व्यायाम?
1- आपले गुडघे वाकवा आणि पायाच्या तळव्यांवर शरीराचा भार घ्या.
2- शक्य तितकं खाली झुका. फार नको. नाहीतर पाठ दुखेल.
3- आपल्या पायांवर म्हणजे गुडघे दुमडून त्या स्थितीत पूर्णपणो खाली बसू नका. 
4- साधारणपणो खुर्चीवर बसताना आपली जी स्थिती असते, त्याच्या थोडं खाली येईल इतके गुडघे वाकवा.
5- आता एका वेळी एक पाय, अशा पद्धतीनं बदकासारखंच त्याच्या फेंगडय़ा आणि फताडय़ा चालीनं चाला. 
यामुळे काय होईल?
1- आपल्या लोअर बॉडीचा अतिशय उत्तम व्यायाम यामुळे होईल.
2- अनेक प्रकारचे खेळ, शर्यती, मार्शल आर्टसाठी, तसंच वॉर्मअपसाठी हा व्यायामप्रकार महत्त्वाचा मानला जातो.
3- पायांची ताकद यामुळे वाढते.
4- शरीर लवचिक होते.
5- शरीरात चापल्य येते. 
6- ढुंगण आणि त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंमधली ताकद वाढते.
7- कोणताही खेळ खेळताना त्याचा उपयोग होतो.
हा व्यायाम आणखी अचूकपणो करायचा असेल, तर बदकाची चाल प्रत्यक्ष, नाहीतर यूटय़ूब व्हीडीओवर नक्की बघा. 

- तुमचीच ‘क्वॅकùù क्वॅकùù’,ऊर्जा

Web Title: Exercise at home- duck walk exercise- stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.