अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 05:37 PM2019-04-29T17:37:57+5:302019-04-29T17:43:58+5:30

अत्तरांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.

Uttar pradesh kannauj city is perfumes specialized in India | अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

Next

(Image Credit :Down To Earth)

अत्तरांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आज आपण जिथे जुनी शहरं, इतिहास विसरून आधुनिकतेचा आधार घेत आहोत. तिथे कनौज मात्र आजही मातीपासून अत्तर तयार करण्याची आपली 500 वर्षांपूर्वीची परंपरा निस्वार्थीपणाने निभावत आहे. असं म्हटलं जातं की, कनौजमधील हवाही आपल्यासोबत सुगंध घेऊनच चालते. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्तराचा व्यापार चालत असून येथे जवळपास 200 पेक्षा अधिक अत्तराच्या फॅक्टरी आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्तर तयार करण्यात येतं. अत्तर तयार करण्यासाठी अनेक शहरांमधून येथे फुलं आणि लाकडांची आयात करण्यात येते. 

(Image Credit : Ananda Apothecary)

मातीपासून तयार करण्यात येतं अत्तर :

अनेक लोक असं सांगतात की, जेव्हा पावसाच्या पाण्याचे थेंब कनौजच्या मातीवर पडतात. तेव्हा या मातीमधून एक वेगळाच सुगंध येतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे, कनौजमधील मातीपासूनही अत्तर तयार करण्यात येतं. यासाठी ताब्याच्या भांड्यांमध्ये माती भाजली जाते. त्यानंतर मातीमधून येणारा गंध बेस ऑइलसोबत एकत्र करण्यात येतो. अशाप्रकारे मातीपासून अत्तर तयार करण्यात येतं. 

(Image Credit : homegrown.co.in)

जगभरात प्रसिद्ध आहे कनौजमधील अत्तर...

खास गोष्ट म्हणजे, जगभरातील सर्वात महाग अत्तर कनौजमध्ये तयार करण्यात येतं. अनेक लोक अस्वस्थता आणि तणाव दूर करण्यासाठी येथील अत्तराचा गंध घेतात. कनौजमधील अत्तर पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांपासून तयार करण्यात येतं. यामध्ये अल्कोहोलचा वापर करण्यात येत नाही. 

कनौजमध्ये जगातील सर्वात स्वस्त अत्तरापासून सर्वा महाग अत्तरांपर्यंत सर्व प्रकारची अत्तरं तयार करण्यात येतात. येथे तयार करण्यात येणाऱ्या अत्तरांपैकी सर्वात महागडं अत्तर 'अदरऊद' आहे. हे अत्तर आसामधील खास लाकडापासून तयार करण्यात येतं. या एक ग्राम अत्तराची किंमत जवळपास 5000 रूपये आहे. 

अहवालानुसार, कनौज येथे तयार करण्यात येणाऱ्या अत्तराची निर्यात यूके, यूएस, सौदी अरेबिया, ओमन, इराक, इरान समवेत अनेक देशांमध्ये करण्यात येते. अत्तराचा वापर कॉस्मेटिकसोबतच गुटखा आणि पान मसाल्यामध्येही करण्यात येतो. 

Web Title: Uttar pradesh kannauj city is perfumes specialized in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.