भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला. ...
ओखी वादळानंतर झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे वाटाण्याएवढ्या झालेल्या फळांची गळ झाली असून, मोहोरही कुजून गेला आहे. त्यामुळे झडलेल्या मोहोरातून पुन्हा मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पालवी जून होऊन मोहोर येऊ लागला ...
सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असतान ...
रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्या ...
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भ ...
लोकशाही दिनामध्ये येणाऱ्या प्रकरणांवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही अनेक महिने निर्णय न घेणाऱ्या नऊ विभागाच्या अधिकाऱ्यांचे डिसेंबर २०१७चे वेतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रोखून ठेवले आहे. ...
कुणाला आयत्यावेळी रक्त हवे असल्यास बिचारा रक्तदाता सामाजिक कार्याच्या भावनेने असेल तेथे, मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचतो, त्याच्या धावपळीमागे एकच कारण असते, रक्त हवे असलेल्या माणसाचा जीव स्वत:च्या रक्ताने वाचवणे. ...
रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात १ जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीला शासकीय आदेशानुसार बंदी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत बंदी काळातही चोरट्या पध्दतीने पर्ससीन मासेमारी सुरू राहिल्याने पारंपरिक मच्छीमार आधीपासूनच सावध भूमिकेत आहेत. यावर्षी बंदी ...