जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
प्रत्येक जण आज शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी कठोर अॅक्शनची मागणी करत आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटला असून बॉलिवूड सेलेब्सनेही दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला आहे. ...
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज (FWICE)ने आज (ता.17) फिल्मसिटीतील दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...