राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Candidate List: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची पहिली यादी याहीर केली. पहिल्या यादीतून अजित पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे. ...
Mahayuti Vidhan Sabha News: भाजपाने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केले. पण, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊनही १०६ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले गेले नाहीत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश दिग्गजांनाच पुन्हा संधी दिली आहे. ...