आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी आहे. ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. ...
'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...
सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवीच्या काव्यसंग्रहाला सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदा धोंगडे यांच्या हस्ते कवी माधव हुंडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते. ...
पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. ...
नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. ...