Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असून, भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच यापुढे गुजराण करावी लागेल, असा घणाघात शिवसेनेने शिंदे गटावर केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: काही दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षांचे काय म्हणणे आहे हे गौण आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...