देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. ...
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ५६ नावांचा ...