रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह

By आनंद डेकाटे | Updated: April 14, 2026 09:01 IST2026-04-14T09:01:09+5:302026-04-14T09:01:30+5:30

एका रुपयाच्या नाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची अपार श्रद्धा, आदर आणि प्रेरणेचा इतिहास दडलेला असू शकतो याची जिवंत साक्ष कामठीतील नागार्जुन संग्रहालयात पाहायला मिळते. एका नाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल १७ हजार नाण्यांपर्यंत पोहोचला आहे.

Dr. Babasa story of faith built from rupee coins; A collection of 17,000 coins | रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह

रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह

- आनंद डेकाटे 
नागपूर  - एका रुपयाच्या नाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची अपार श्रद्धा, आदर आणि प्रेरणेचा इतिहास दडलेला असू शकतो याची जिवंत साक्ष कामठीतील नागार्जुन संग्रहालयात पाहायला मिळते. एका नाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल १७ हजार नाण्यांपर्यंत पोहोचला आहे.

मुख्य संग्राहक दिवंगत दिलीप वानखेडे यांनी या संग्रहासाठी वानखेडे यांनी राज्यभर भ्रमंती केली. जिथे जिथे हे नाणे मिळण्याची शक्यता होती तेथे जाऊन नाणी गोळा केली. 

राष्ट्रीय स्तरावर गौरव
एक रुपयाच्या नाण्यांचा तब्बल १७ हजारांचा संग्रह आज कामठी येथील नागार्जुन संग्रहालयाची शान बनला आहे. या अमूल्य संग्रहाची दखल घेत लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने ११ फेब्रुवारी २०१६ रोजी राष्ट्रीय स्तरावर नोंद करून मुख्य संग्राहक दिवंगत दिलीप वानखेडे यांचा गौरव केला होता.

अमेरिकेत पहिला जागतिक तत्त्वज्ञान पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली असून, सोसायटी फाॅर ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलाॅसाॅफी  या अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेने ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ या क्षेत्रातील हा पुरस्कार अमेरिकेतील एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने सुरू होणारा पहिलाच जागतिक सन्मान ठरत आहे. या निर्णयामुळे डॉ. आंबेडकरांचे विचार केवळ भारतीय सामाजिक परिवर्तनापुरते मर्यादित नसून जागतिक तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title : रुपये के सिक्कों से बनी आस्था की कहानी: 17,000 सिक्कों का संग्रह

Web Summary : कामठी संग्रहालय में दिलीप वानखेड़े द्वारा एकत्रित 17,000 रुपये के सिक्कों के माध्यम से डॉ. अम्बेडकर की विरासत को दर्शाया गया है। लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स द्वारा राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त, यह अम्बेडकर के वैश्विक दार्शनिक प्रभाव को उजागर करता है। उन्हें मरणोपरांत एक अमेरिकी संस्थान द्वारा सम्मानित किया गया।

Web Title : Faith's Story Built From Rupee Coins: Collection of 17,000 Coins

Web Summary : Kamthi's museum showcases Dr. Ambedkar's legacy through 17,000 rupee coins collected by Dilip Wankhede. Recognized nationally by Limca Book of Records, it highlights Ambedkar's global philosophical impact. He was awarded posthumously by an American institution.