शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मैदान बचावासाठी तरुणाचे पुन्हा उपोषण

By admin | Updated: January 26, 2016 01:57 IST

आधीच ठाण्यात खेळण्यासाठी मैदानांचा तुटवडा असताना आता आहे त्या मैदानांचाही गळा घोटण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.

ठाणे : आधीच ठाण्यात खेळण्यासाठी मैदानांचा तुटवडा असताना आता आहे त्या मैदानांचाही गळा घोटण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. स्टेशनच्या अगदी नजीक असलेले गावदेवी मैदानदेखील आता खाजगी कार्यक्रमांसाठी आंदण देत असताना आणि तिथे सध्या एक शौचालय असताना पुन्हा दुसरे शौचालय बांधण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ एका तरुणाने पुन्हा एकदा सोमवारपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदान आहे. या मैदानात पूर्वी जुनी भाजी मंडई होती. ती असतानादेखील येथे संपूर्ण मैदानभर विनापरवानगी पार्किंग प्लाझा सुरू होता. दरम्यान, या समस्येच्या विरोधात २००८ मध्ये राहुल शेलार या तरुणाने उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन पालिकेने येथील पार्किंग कायमचे बंद केले. त्यामुळे अर्ध्या जागेत का होईना खेळाडूंना सराव करायला मिळत होता.शेलार यांच्या उपोषणाची दखल घेताना येथे जॉगिंग ट्रॅकसह क्रीडाप्रेमींना इतरही सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. दुर्दैवाने आजही ती उपलब्ध झालेली नाही. मागील वर्षी पालिकेने येथील मंडई हलवून हे मैदान मोकळे केले. परंतु, तरीही येथे मैदानाच्या एका बाजूला दुचाकी पार्किंग होत असल्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढे असताना आता पालिकेने ज्या ठिकाणी पूर्वी मंडई होती, त्याच ठिकाणी आता शौचालयाचे काम सुरु केले. तसेच अंडरग्राउंड पार्किंगचा प्रस्ताव आणला आहे. विशेष म्हणजे याच मैदानाच्या खालच्या टोकाला सद्य:स्थितीत एक शौचालय आहे. ते असताना पुन्हा नवीन शौचालय कशासाठी, असा ठाणेकरांचा सवाल आहे.