जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे 

By सुरेश लोखंडे | Updated: June 21, 2024 18:14 IST2024-06-21T18:13:58+5:302024-06-21T18:14:53+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेण्यात आला.

years of yoga on the occasion of international yoga day at the collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे 

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे 

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियाेजन भवनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेण्यात आला.

या याेगा वर्गाला उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार संजय भोसले, माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. आजच्या धावपळीच्या जीवनात शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व असून जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून रोज योगाभ्यास करावा, असे आवाहन ठाेंबरे यांनी केले. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी रेखा दीदी, ब्रह्माकुमारी सविता बहन यांनी योगा प्रात्यक्षिक व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेतले.

Web Title: years of yoga on the occasion of international yoga day at the collectorate