शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

"भविष्यात कोण कोणाची मदत घेईल, काहीही होऊ शकते", शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर बाळा नांदगावकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:37 IST

MNS Shiv Sena Alliance KDMC: कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला मनसेने पाठिंबा दिला. मुंबई, ठाण्यात उद्धवसेनेत लढलेल्या मनसे शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

"स्थानिक परिस्थिती काय आहे, हे मला माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोक असतात. ते आघाडी युती करतात. निशाणीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात. माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत. त्यांनी अंतर्गत तडजोड केली असावी", असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक मोठं विधान केले. 

महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांची अनेक ठिकाणी कसोटी लागली आहे. अनेक महापालिकांमध्ये त्रिशंकू अवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी प्रत्येक पक्ष इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेत नवे राजकीय समीकरण जुळून आले आहे. शिंदेसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. 

याच मुद्द्यावर बोलताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, "सगळीकडे असेच चित्र दिसत असते. वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हा शतप्रतिशत नारा त्यांनी दिला होता. हल्ली अनेक पक्ष हा नारा देतात. आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही बिनसले असेल, तर माहिती नाही. कल्याण डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेचे बिनसले असावे. त्यामुळे तडजोडी झाल्या असाव्यात. काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात, तेव्हा काही बोलायच्या नसतात", असे सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केले. 

नांदगावकर म्हणाले, "भविष्यात काहीही होऊ शकते" 

"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणामध्ये नवीन नाहीत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कोणीही मित्र वा शत्रू नसतो. कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक बघून चालत नाही. मुंबईकरांचे आभार मानतो. आमच्या पक्षाचे नुकसान अधिक झाले, हे मान्य करतो. मात्र, तडजोडी होत असतात. भविष्यात कोण कोणाची मदत घेईल, काहीही होऊ शकते", असे भुवया उंचावणारे विधान बाळा नांदगावकर यांनी केले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदेसेनेचे महापालिकेत ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anything can happen in future, says Bala Nandgaonkar after supporting Shinde Sena.

Web Summary : MNS leader Bala Nandgaonkar stated political equations shift; anything is possible. He acknowledged MNS losses but highlighted Kalyan-Dombivli's new alliance with Shinde Sena, hinting at future possibilities and strategic adjustments in politics.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MNSमनसेShiv SenaशिवसेनाBala Nandgaonkarबाळा नांदगावकर