शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेचं चाललंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 23:57 IST

पक्ष पदाधिकाऱ्यांचा सवाल : दीपाली सय्यद यांना सोडलं एकाकी

- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात अनेक जण इच्छुक असतानाही शिवसेनेने शहराबाहेरील अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या वागळे इस्टेट येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेत त्या हजर नव्हत्या. या सभेत ठाणे जिल्ह्यातील १८ जागा महायुती जिकेंल, असा दावा ठाकरे यांनी केला. तसेच मुंब्रा-कळव्याची जागाही शिवसेनाच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, ठाण्यातील हीच जागा वगळता इतर तीन जागा शिवसेनेच्या दृष्टीने तशा सोप्या मानल्या जात आहेत. असे असतानाही मुंब्य्रात किंवा कळव्यात सभा का घेतली नाही, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. ना शिवसेनेचे पदाधिकारी या मतदारसंघात फिरकत आहेत, ना वरिष्ठ मंडळी, त्यामुळे प्रचार कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, असा पेच सध्या एकाकी पडलेल्या सय्यद यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांवर भगवा फडकविण्याची गर्जना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सभेत केली. यात त्यांनी मुंब्रा-कळवा विधानसभेच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. पण, गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल का, असा संशय शिवसैनिकांसह इतर पक्षांच्या मतदारांच्या मनात उभा राहिला आहे. कारण, शिवसेनेने या ठिकाणी उभ्या केलेल्या मराठी तारका दीपाली सय्यद यांच्या प्रचारार्थ पक्षाचा कोणताही मोठा नेता मतदारांच्या नजरेस पडला नाही.

सेनेसाठी आव्हान असलेली ही जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांची एखादी सभा, रोड शो कुणाला घ्यावासा वाटला नाही. उलट, ज्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा विजय विक्रमी मतांनी होण्याची शाश्वती असतानाही पक्षाच्या नेत्यांनी तेथेच ठाकरे यांची सभा घेतली.मुंब्रा-कळवा मतदारसंघात बºयापैकी विकासकामे झाली आहेत. आव्हाडांची भक्कम स्थिती असतानाही सेनेने येथे आयात उमेदवार का द्यावा, याचे कोडे मतदारांना पडले नसेल तर नवल. कारण, अहमदनगरच्या दीपाली यांचा या मतदारसंघाशी तसा काहीच संबंध नाही.२००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेने सुभाष भोईर यांना निवडून आणले होते. ते मुंब्रा निवासी असताना आणि अनेक वर्षांपासून त्यांचे कार्यक्षेत्र मुंब्रा असतानाही बाहेरून उमेदवार आणून आव्हाडांचे पारडे अप्रत्यक्षपणे जड करण्यास मदतच केल्याची चर्चा आहे.

दीपाली प्रचारात तेवढ्या सक्रीय नसून, उद्धव ठाकरे यांच्या सभेतही त्या नव्हत्या. येथे लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि संजय केळकर यांची नावे होती. दीपाली यांना बॅनरवरही जागा मिळाली नाही. त्यामुळे दीपाली आणि शिवसेनेचं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

टॅग्स :mumbra-kalwa-acमुंब्रा कळवाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019