शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

स्वागतयात्रेत शहरी अन ग्रामीण ठाण्याचे दर्शन

By admin | Updated: March 22, 2017 01:28 IST

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे अयोजित केलेल्या बैठकीत स्वागतयात्रेच्या रुपरेषासंदर्भात आढावा घेण्यात आला.

ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे अयोजित केलेल्या बैठकीत स्वागतयात्रेच्या रुपरेषासंदर्भात आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे यंदा अबोली रिक्षाचालक देखील स्वागतयात्रेत सहभागी होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी सायकल वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून स्वागत यात्रेत स्मार्ट ठाण्यासह जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण जनजीवनाचा चित्ररथ सहभागी करून घेतला जाणार आहे.सोमवारी ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, न्यासाचे अध्यक्ष मा.य. गोखले, स्वागताध्यक्ष डॉ. उदय निरगुडकर, निमंत्रक अंजली ढोबळे, मुकेश सावला, संजीव ब्रह्मे, डॉ. अंजली बापट, कविता वालावलकर आदी उपस्थित होते. स्वागतयात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे आश्वासन मढवी यांनी दिले. मावळी मंडळाने आमचे कार्यकर्ते वेळेत हजर राहतील असे आश्वासन दिले. अंगणवाडी सेविका सुवर्णा पिंगोळकर यांनी दीपोत्सवाच्या दिवशी अंगणवाडी कशी चालते याचे प्रात्यक्षिक दाखविण्याची इच्छा व्यक्त केली. यात्रेत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याचे हिंदू जनजागृती प्रणित रणरागिणीच्या सविता लेले यांनी सांगितले. एसटी महामंडळ ग्रुपतर्फे बस आणणार असून त्यांनी एसटी विश्वाचे दर्शन ठाणेकरांना घडेल, असे तनय दांडेकरने सांगितले. सायकल चालवा, प्रदूषण टाळा, इंधन वाचवा असा संदेश देत २५ सायकलप्रेमी सहभागी होणार असल्याचे रिसायकल संस्थेचे मनिष नाखवा यांनी सांगितले. तर शहरी व ग्रामीण भागांतील जनजीवन दाखविणारा चित्ररथ आणि दुचाकीवर पारंपारिक वेशात हेल्मेट घालणार असल्याचे रोटरी क्लब आॅफ ठाणे सेंट्रलच्या ओमकार सावंतने सांगितले. दरम्यान, भाजपचे डॉ. राजेश मढवी यांनी यात्रेसाठी एक लाखांचा धनादेश गोखले यांच्याकडे दिला. (प्रतिनिधी)