शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Video: भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 22:07 IST

भाजपा आमदार आणि भाजपाचेच माजी महापौर यांच्यातील वाद रविवारी विकोपाला गेला. माजी महापौर असलेल्या नेत्याने आमदाराच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केली.

भिवंडी : भाजपाचे आमदार महेश चौघुले व माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. विलास पाटील समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे. 

पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, मात्र परीसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये वाद काय?

महापालिका निवडणुकीत प्रभाग एकमध्ये भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले हा आणि माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते.

पाटील यांनी चौघुले यांचा पराभव केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे घटना घडल्या होत्या.

असे काय घडले की वाद वाढला?

रविवारी सायंकाळी उशीरा विलास पाटील आपल्या मतदारांचे आभार मानत असतानाच भाजपा आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. 

या हल्ल्याची माहिती विलास पाटील यांना समजताच विलास पाटील व त्यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून आमदार चौघुले समर्थकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

सुरुवातीला आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून, ज्यात महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले विलास पाटील यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन  हल्ला करायला गेला असल्याचे स्पष्ट दिसते. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi: BJP MLA and ex-mayor groups clash violently, tension rises.

Web Summary : A violent clash erupted between BJP MLA Mahesh Chaughule and ex-Mayor Vilas Patil's groups in Bhiwandi. Patil's supporters allegedly attacked Chaughule's office, leading to a tense situation. The conflict stems from a municipal election rivalry between their sons. Police intervened to control the situation after supporters attacked each other's homes.
टॅग्स :bhiwandiभिवंडीViral Videoव्हायरल व्हिडिओCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६