शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?

By admin | Updated: June 30, 2017 02:41 IST

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. आता या केंद्राचा शुभारंभ जुलैमध्ये होणार आहे. विद्यापीठाकडून शुभारंभाची आश्वासने पाळली जात नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कल्याण उपकेंद्राची इमारत बांधून झाल्याने ते सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंकडे माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगले यांनी केली होती. या मागणीपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यावर, उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जून संपत आला तरी हे केंद्र सुरू झालेले नाही. कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत, देवळेकर यांना विचारले असता, त्यांनी कुलगुरूंना फोन लावला. मात्र, रेंजअभावी त्यांच्याशी संभाषण झाले नाही.उपकेंद्राचा मुद्दा २००५ पासून गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रा. इंगळे हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. विद्यापीठाने ठाण्यातील उपकेंद्र सुरूही केले. कल्याणच्या उपकेंद्राच्या उभारणीत विद्यापीठाकडूनच दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यापीठाने उपकेंद्रासाठी सुरुवातीला एक कोटीची तरतूद केली होती. महापालिकेने उपकेंद्रासाठी गांधारे येथील जागा नाममात्र भाडेतत्त्वावर दिली. त्याच्या बदल्यात केवळ एक रुपया घेतला होता. जागा दिल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने शिवसेना सदस्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर, उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. हे उपकेंद्र दोन टप्प्यांत बांधले जाणार आहे. दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी २० कोटी याप्रमाणे ४० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करून तळ अधिक एक मजला अशी २५ खोल्यांची इमारत उभी राहिली आहे. ही इमारत शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. याठिकाणी एम-टेकची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाचे केंद्र सुरू केले जाणार आहे. कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भागांतील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याऐवजी कल्याणमध्ये ही सुविधा मिळणार आहे. जूनमध्ये हे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे निकाल लागले आहेत. अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणचे उपकेंद्र उपयुक्त ठरले असते. आता प्रवेशप्रक्रिया संपल्यावर उपकेंद्राचा शुभारंभ होऊन फायदा होईल का, याविषयी साशंकता आहे.