निवडणुकीसाठी केंद्रीय आयुक्तांकडून उद्यापासून कामकाजाची दोन दिवशीय झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 08:07 PM2019-09-16T20:07:32+5:302019-09-16T20:15:19+5:30

* १९५० टोलफ्री क्रमांक- मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मतदारांना १९५० या टोलफ्री क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर घरात पाणी शिरल्यामुळे मतदान कार्ड हरवले असेल, वाहून गेलेले असल्यास त्या विषयीची माहिती देखील या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Two working days from the Central Commissioner for the election tomorrow | निवडणुकीसाठी केंद्रीय आयुक्तांकडून उद्यापासून कामकाजाची दोन दिवशीय झाडाझडती

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कामकाजाची माहिती दिली

Next
ठळक मुद्दे ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार १९५० टोलफ्री क्रमांकसहा हजार ६२१ मतदान केंद्र

ठाणे : विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी घोषीत होण्याची शक्यता आहे. यास अनुसरून ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कामकाजाची माहिती दिली. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आरोरा व अशोक लवासा १७ सप्टेंबरपासून राज्याच्या दोन दिवशीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात निवडणुकीच्या कामकाजाचा वन टू वन आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी केले.
           जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियोजनही केले आहे. याशिवाय पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या देखील निवडणूक आयुक्ता सुरक्षेच्या दृष्टीने दोन बैठका पार पडल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या विधानसभाच्या निवडणुकीसाठी सहा हजार ४८८ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. त्यावर ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ३४ लाख ४७ हजार १४८ पुरूषांसह २८ लाख ८२ हजार ४८८ महिला आणि ४६१ तृतीय पंथीयांना या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क दिलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये ५५ लाख ६२ हजार ९६५ मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आहे. तर ५४ लाख ८५ हजार ९३५ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. येािील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
          लोकसभा निवडणुकीपेक्षा एक लाख पाच हजार ६१० मतदार या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाढले आहेत. तर मतदार यादीतून सहा हजार ४४४ मतदार वगळण्यात आलेले आहेत. यामध्ये तीन हजार ८६६ पुरूषांसह दोन हजार ५७८ महिला मतदार वगळण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाचा हक्क दिलेल्या ६३ लाख २९ हजार ३८५ मध्ये प्रथमच मतदान करणाऱ्यां ८१ हजार २५६ तरूण मतदारांचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले. या मतदाराच्या मतदानासाठी ११ हजार ५९२ बॅलेट युनिट लागणार आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे १२ हजार २३४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. कंट्रोल युनीट आठ हजार २८० लागणार आहेत. पण आठ हजार ७३४ कंट्रोल युनीट तैनात केले आहे. याशिवाय आवश्यतेपेक्षा अधिक म्हणजे नऊ हजार ३८८ व्हीव्ही पॅड मशीन मतदानासाठी सज्ज केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
         या निवडणुकांसाठी शहरी व ग्रामीण भागात एक हजार ५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्राचा निषक लावण्यात आलेला आहे. त्यानुसार सहा हजार ६२१ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. यामध्ये सहा हजार ४८८ मुळ मतदान केंद्र असून सहाय्यकारी १३३ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यामधील पाच हजार ५०८ मतदान केंद्र तळमजल्यावर आहेत. तर मंडपात ८३२ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. लिफ्टची सुविधा असलेल्या पहिल्या मजल्यावर १९९ मतदान केंद्र आहेत. दुसऱ्यां मजल्यावर ५० आणि तिसऱ्यां मजल्यावर दोन मतदान केंद्र जिल्हा प्रशासनाने या विधारसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निश्चित केले आहेत.
         या निवडणुकीसाठी तुर्भे येथील केंद्र शासनाने गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन व निवडणुकीचे साहित्य ठेवले जाणार आहे. कोपरी येथील गोडाऊनमधील सर्व साहित्य तुर्भे येथील गोडाऊनमध्ये हलवण्यात येणार आहे. तुर्भे येथील गोडाऊन मोठे असल्यामुळे कंटेनर व इतर वाहने उभी करण्यासह वळवण्यासाठी मैदान आहे. या गोडाऊनमधूनच जिल्ह्यातील १८ विधानसभाच्या मतदान केंद्रांवर साहित्य पाठवण्याच नियोजन केले आहे. याशिवाय १८ स्ट्रॉग रूम्स व १८ मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणांची देखील पाहणी करून ते निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
..........

Web Title: Two working days from the Central Commissioner for the election tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.