दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:14 IST2021-03-13T05:14:00+5:302021-03-13T05:14:00+5:30

भिवंडी : भिवंडीत वाहनचोरीच्या घटना वाढत असून गुन्हे शाखेने वाहनचोरी प्रकरणी तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातील चोरीच्या तीन ...

Two-wheeler thieves sniffed | दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या

दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या

भिवंडी : भिवंडीत वाहनचोरीच्या घटना वाढत असून गुन्हे शाखेने वाहनचोरी प्रकरणी तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातील चोरीच्या तीन महागड्या दुचाकी जप्त केल्या.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना काही तरुण दुचाकी चोरी करून त्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लतीफ मन्सुरी यांनी टोळीवर पाळत ठेवून सईम सलीम कुवारी (२२), सुफियान उर्फ गोगा शहा (२०) व एका १७ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेल्या एक लाख तीस हजारांच्या तीन महागड्या दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी कापूरबावडी पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण आणि कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

Web Title: Two-wheeler thieves sniffed