शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागण्यापूर्वी ठामपा आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करा, निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 19:39 IST

सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये

ठाणे : सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये, अन्यथा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचे स्थानिक हितसंबंध तयार होतात, विशेषतः निवडणुकांच्या वेळी या हितसंबंधांचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकीच्या आधी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून दिले जातात, लोकशाही तत्वप्रमाणे ही एक योग्य परंपरा  प्रत्येक निवडणुकीत पाळली जाते. 

ठाणे महापालिकेत मात्र संजीव जैस्वाल हे साडे चार वर्षे त्यांच्या हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, महापौर व अनेक नगरसेवक याबाबतीत वारंवार निषेध करीत आहेत, असे असतानाही, खूप तक्रारी असूनही, केवळ पालक मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांची बदली केली जात नाही आणि आता राज्यात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातलेल्या असताना त्यांची बदली करणे हे अत्यावश्यक बनले आहे, असे निदर्शनास आणून आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची बदली करावी अशी मागणी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून करण्यात आली आहे, कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे यांनी असे पत्र लिहिले आहे.

सरकारी मार्गदर्शक तत्वे व नियमाला अनुसरून तशी बदली करणे आवश्यक बाब आहे, अशी बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला द्यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली असून या पत्राची प्रत राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील पाठविण्यात  आली आहे. 

अशा प्रकारे बदली न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका सादर करून हा प्रश्न धसास लावण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन उन्मेष बागवे यांनी केले असून वेळ पडल्यास शिवसेना-भाजप वगळून अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक अधिसूचना लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता असताना घटनात्मक पेचप्रसंग उभा राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका