शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 01:19 IST

मनसे देणार कौशल्यविकासाचे धडे

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : शहरात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय लॉकडाउनमुळे मूळ गावी परतल्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. छोटे व्यवसाय, कौशल्यपूर्ण कामांमध्ये भूमिपुत्रांनी यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परप्रांतीय गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भूमिपुत्रांनी भरून काढून या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा सर्वच थरांतून केली जात आहे. मनसेने त्यासाठी मराठी तरुणांमध्ये कौशल्यविकासाबाबत योजनाही आखली आहे.

ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांची संख्या अधिक आहे. लॉकडाउनमुळे उपासमार, पगार नसल्याने घराचे भाडे भरण्यास पैसे नसल्याने ते मूळ गावी परतत आहेत. परप्रांतीयांच्या जाण्यामुळे हार-फुलांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉण्ड्री, इलेक्ट्रॉनिक कामे, भाजी, मासळी, फळव्यवसाय, वेल्डर, सुरक्षारक्षक, सुतारकाम, बांधकाम, रिक्षा-टॅक्सी व्यवसाय अशा अनेक छोट्या-मोठ्या रोजगारांची संधी मिळणार आहे. मनसेने यासाठी पुढाकार घेऊन मराठी तरुणांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील अमराठी व्यापारीही भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबत आग्रही आहेत. भूमिपुत्रांनी पुढे येऊन ही कामे करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठी माणसाने व्यवसाय करावा, यासाठी अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी ‘चला उद्योजक होऊ या’ ही मोहीम हाती घेतली आहे. भरपूर कामे असून कोणीही बेरोजगार राहणार नाही, असे नाकती यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे निराश न होता मराठी तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय करून त्यावर मात करावी. या परिस्थितीचा जे फायदा घेतील, तेच टिकतील, असेही नाकती म्हणाले.

मराठी तरुणांमध्ये कला-कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून त्यासाठी योजनाही आखली आहे. ठाणे महापालिकेने फेरीवाला समितीचे सर्वेक्षण करून भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणसालाच प्राधान्य मिळावे, असे आमचे मत आहे. आता चांगली संधी चालून आली आहे. मातृभाषेतून ग्राहकाला एखादी वस्तू पटवून देणे सोपे जाते, असे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले. लॉकडाउननंतर कामगारांची गरज लागणार असून भूमिपुत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा, असेही शहा म्हणाले.

मराठी व्यावसायिकांना मदत करणार!

कोणत्याही कामाची लाज न बाळगता मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच, लॉकडाउनमुळे ज्या मराठी मुलांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत, अशांना उभारी घेण्यासाठी मदत करणार असल्याचेही पाचंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र