बेपत्ता तीन मुले ठाण्यात सापडली

By Admin | Updated: February 20, 2017 05:40 IST2017-02-20T05:40:23+5:302017-02-20T05:40:23+5:30

नवी वस्ती येथे राहणारे तीन मित्र खेळण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडले. ही तीन अल्पवयीन मुले ठाणे रेल्वे स्थानकावर

Three of the missing children were found in Thane | बेपत्ता तीन मुले ठाण्यात सापडली

बेपत्ता तीन मुले ठाण्यात सापडली

भिवंडी : नवी वस्ती येथे राहणारे तीन मित्र खेळण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडले. ही तीन अल्पवयीन मुले ठाणे रेल्वे स्थानकावर सापडली. जीवाची मुंबई करण्यासाठी हे तिघे घरून निघाले. खेळाच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुले घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्र ार केली. हे तिघेही सुभाषनगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहेत.
बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यावर जेवण उरकून या तिघांनी मुंबईला जाण्याचा बेत आखला. खेळायला जातो, असे सांगून तिघेही बाहेर पडले. दोन रात्री ठाणे परिसरात काढून शुक्र वारी मुंबईला जाण्यासाठी लोकलमध्ये बसण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, रेल्वेत विनातिकीट पकडले जाऊ, अशी भीती या मुलांत असल्याने ते रेल्वे स्थानकावर घुटमळत होते. तीन मुले बराच वेळ झाला, तरी परिसरात वावरत असल्याचे गस्तीवरील रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केली, तेव्हा तिघेही जीवाची मुंबई करण्यासाठी गुपचूप भिवंडीतून निघाल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. (प्रतिनिधी)

Web Title: Three of the missing children were found in Thane