शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

चोर, दरोडेखोर पोलिसांच्या हाताबाहेर !

By admin | Updated: August 21, 2015 02:18 IST

सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळया महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत.

मुंबई : सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळया महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. बहुधा पोलिसांचा धाक नसल्याने या गंभीर गुन्हयांची महाराष्ट्रात सर्वाधिक नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर लोकसंख्येच्या मानाने ही गुन्हेगारी राज्यात झपाटयाने वाढते आहे. पर्यायाने चोरी झालेल्या मालमत्तेतही राज्य पहिल्या स्थानी येऊन पाहोचले आहे.मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबईत तर दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात. प्रत्येक गुन्हयात सरासरी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मारले जातात. विशेषत: या गुन्हयांमधले लक्ष्य हे रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या स्त्रीया आहेत. आज एक तोळे सोन्याची किंमत २६ हजारांच्या आसपास आहे. तीन तोळयाचा दागिना चोरी झाला तर तो फटका कोणत्याही स्तरातल्या कुटुंबाला सोसणारा नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी महाराष्ट्रात सोनसाखळी चोरीसोबत अन्य जबरी चोरीचे ९४६६ गुन्हे घडले. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून तिथे ६४६४ तर तिसऱ्या स्थानी असलेल्या उत्तरप्रदेशात ३९२० गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे ३ जबरी चोरीचे गुन्हे हा संपूर्ण देशभरातील सरासरी दर आहे. हाच दर महाराष्ट्रात ८ इतका आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दरोडेही महाराष्ट्रात सर्वाधिक पडले. गेल्यावर्षी दरोडयांचे ८८५ गुन्हे घडले. त्यातल्या १३ गुन्हयांमध्ये दरोडेखोरांनी १५ जणांची हत्या केली. देशातला दर ०.४ इतका असून राज्यात तो दुप्पट म्हणजेच ०.८ इतका आहे. महाराष्ट्रानंतर ओडीशात ४८४, कर्नाटक-उत्तरप्रदेशात २९० दरोडयाचे गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्रात घरफोडयांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत मोठे आहे. गेल्यावर्षी राज्यात ३७२५ इतक्या घरफोडया घडल्या. दिल्लीत ३४२६, गुजरातेत २८३९ घरफोडीच्या गुन्हयांची नोंद झाली. चोरी या प्रकारात एनसीआरबीने मोबाईल चोरी, पाकिटमारीपासून वाहनचोरीपर्यंतचे गुन्हे एकत्रित केले आहेत. चोरीत दिल्ली देशात सर्वोच्च आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ७८७५३ तर महाराष्ट्रात ५६२८३ चोरीच्या गुन्हयांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमधील चोरीचा दर हा दरलाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ३८८.३, ४७.८ इतका आहे. मात्र देशातील चोरीच्या गुन्हयांचा दर हा ३५.४ इतका आहे. चोरीच्या उददेशाने घरात घुसणे, चोरी करणे या गुन्हयातही महाराष्ट्रच एक नंबरवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्याहून कमी गुन्हे घडले आहेत. या गुन्हेगारीचा दर पाहिल्यास दिल्ली महाराष्ट्रापेक्षा जास्त असुरिक्षत आहे. देशातील सरासरी दरापेक्षा महाराष्ट्रातलीही गुन्हेगारीही वाढली आहे.