शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील त्या खवल्या मांजराला मुक्तसंचारासाठी पाचाडच्या जंगलात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:09 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात दुर्मिळ प्राण्याच्या तस्करीचे प्रकार वाढल्याचे पोलीस कारवाईने स्पष्ट दिसत आहे.

ठळक मुद्देत्या तिघांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीरायगड जिल्ह्यातील जंगलातून पकडले

ठाणे : नष्ट होत चाललेल्या दुर्मीळ प्रजातीतील खवल्या मांजराच्या सुटकेनंतर त्याला ठाणे शहर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने रायगडमधील पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहे. तर, याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील बाळकुम परिसरात खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या देवजी सावंत (४२), संजय भोसले (४६) आणि रामदास पाटील (५६) या तिघांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक करून १० किलो वजन आणि ९२ सेमी लांबीची मादी असलेल्या मांजराला ताब्यात घेतले होते. ते त्यांनी रायगड जिल्ह्यातील जंगलातून पकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात पुढे आले आहे. या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी ते मांजर शुक्रवारी रात्री वनविभागाच्या मदतीने पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले. तसेच ते मांजर नेमके कोणाला विकणार होते, याबाबत अद्यापही माहिती पुढे आली नसून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत......................

 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी