...तर हॉटेलच्या नळजोडण्या तोडणार
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:53+5:302016-03-16T08:36:53+5:30
भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हॉटेलचालकांना पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासाठी

...तर हॉटेलच्या नळजोडण्या तोडणार
ठाणे : भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हॉटेलचालकांना पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे, तसेच हॉटेलची जागा, टेबलखुर्ची धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास हॉटेलसाठी दिलेली नळजोडणी खंडित करण्याचा इशारा महापौर संजय मोरे यांनी दिला आहे. पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मंगळवारी महापौर दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जुन्या विहीरी या पुनरु ज्जीवित करण्यात येणार असून विहिरींची साफसफाई व दुरूस्तीची कामे येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. या बैठकीस उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृहनेत्या अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, शिवसेना गटनेते संतोष वडवले, भाजपा गटनेते संजय वाघुले, काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगांवकर, नगरसेवक दशरथ पालांडे, विलास सामंत, नारायण पवार, सुहास देसाई, रामभाऊ तायडे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रविंद्र खडताळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते.
- शहरातील विविध भागात असलेल्या विहिरी पुनरूज्जीवीत करण्यात येणार असून पाच ठिकाणच्या विहिरींचे पाणी हे प्रायोगिक तत्वावर शुद्धीकरण करुन त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर ते पिण्यायोग्य असल्यास सर्र्व विहिरींवर पंप बसूवन नागरिकांना देण्यात येईल.