उल्हासनगरात वाढत्या उन्हाचा तडाखा; पाण्याची प्लास्टिक टाकी चक्क झाली ब्लास्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 20:52 IST2026-05-01T20:42:41+5:302026-05-01T20:52:29+5:30

नागरिकांच्या सोयीसाठी बोअरवेल विधुत पंपाजवळ बसाविण्यात आलेली प्लास्टिक टाकी वाढत्या उन्हामुळे फुटल्याचा प्रकार उघड झाला.

The increasing heat in Ulhasnagar; A plastic water tank exploded! | उल्हासनगरात वाढत्या उन्हाचा तडाखा; पाण्याची प्लास्टिक टाकी चक्क झाली ब्लास्ट!

उल्हासनगरात वाढत्या उन्हाचा तडाखा; पाण्याची प्लास्टिक टाकी चक्क झाली ब्लास्ट!

उल्हासनगर : कॅम्प नं-४, दहा चाळ नालंदा शाळा येथे नागरिकांच्या सोयीसाठी बोअरवेल विधुत पंपाजवळ बसाविण्यात आलेली प्लास्टिक टाकी वाढत्या उन्हामुळे फुटल्याचा प्रकार उघड झाला. महापालिकेने नागरिकांसाठी नवीन प्लास्टिक टाकी बसविण्याची मागणी होत आहे. 

उल्हासनगर वासियांना पाणी टंचाईच्या झळा बसू नये म्हणून महापालिकेने अनेक ठिकाणी बोअरवेलची सुविधा दिली. तसेच त्याठिकाणी विधुत पाणी मशीन व पाणी साठविण्यासाठी प्लास्टिक टाक्या बसाविण्यात आल्या आहेत. अनेक प्लास्टिक टाकी जुन्या व धोकादायक झाल्या असून त्या जागी नवीन प्लास्टिक टाकी बसाविण्याची मागणी होत आहे. दहा चाळ नालंदा शाळे जवळ अशीच बसाविण्यात आलेली बोअरवेल शेजारील पाण्याची टाकी वाढत्या उन्हामुळे पूर्ण भरल्यानंतर ब्लास्ट झाली. नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन टाकी बसविण्यात यावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केल्याची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी दिली आहे.

Web Title : उल्हासनगर: भीषण गर्मी से पानी की टंकी में विस्फोट; बदलने की मांग

Web Summary : उल्हासनगर में भीषण गर्मी के कारण नालंदा स्कूल के पास एक प्लास्टिक की पानी की टंकी फट गई। निवासियों ने नगरपालिका से पानी की कमी से बचने के लिए एक नई टंकी लगाने का अनुरोध किया है, क्योंकि पुरानी टंकियां खतरनाक साबित हो रही हैं। तत्काल एक नई टंकी की आवश्यकता है।

Web Title : Ulhasnagar: Scorching Heat Causes Water Tank Blast; Replacement Demanded

Web Summary : In Ulhasnagar, extreme heat caused a plastic water tank near Nalanda School to burst. Residents are requesting the municipality to install a new tank to avoid water scarcity, as the old tanks are proving hazardous. A new tank is needed urgently.