शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘काहीतरी कर’च्या पाठीशी ठाणेकर

By admin | Updated: October 6, 2015 00:28 IST

लोकमतने सुरू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या उपक्रमांतर्गत ठाणे शहरात तलाव संवर्धन, ठाणेकरांनी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये तसेच सोनसाखळी

लोकमतने सुरू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या उपक्रमांतर्गत ठाणे शहरात तलाव संवर्धन, ठाणेकरांनी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये तसेच सोनसाखळी चोरी टाळण्यासाठी महिलांनी कसे सतर्क रहावे यासारख्या विविध विषयांवर जनजागृतीपर मोहिम राबविली आहे. भरपावसात भिजून महापौर संजय मोरे यांनी रायलादेवी तलावाच्या संवर्धनासाठी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांना तलाव संवर्धनाबाबतचे निवेदन लोकमतच्यावतीने देण्यात आले. शनिवारी दुपारी काहीतरी कर ठाणेकरच्या सर्व चमूने तीन हात नाका येथे हॉर्न न वाजवण्यासाठी गुलाबाचे फुल देऊन रिक्षाचालक, कारचालक, मोटारसायकलस्वार यांना आवाहन केले. महिलांनी सोनसाखळी चोरांपासून कशी सावधानता बाळगावी याविषयी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांनी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मार्गदर्शन केले.स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकारांचा महिलांसमवेत सुसंवादमहिलांनी स्वसंरक्षणासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. साखळी चोरांची स्वत:ची मोठी टीम असते. सध्याच्या काळात या सर्व गोष्टीला न घाबरता हिमंतीने तोंड देणे भाग आहे. लोकमततर्फे रबिवण्यात येणार हा सामाजिक उपक्र म कौतुकास्पद आहे. प्रत्येक व्यक्तीला पोलीस गुन्हेगार ठरवितात ही सामन्य माणसाची संकल्पना चुकीची आहे. तसेच आपण छोटी मोठी कामे लवकर होण्यासाठी पैसे देतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो हा भ्रष्टाचार कमी होणे गरजेचे आहे असा सल्लाही या कलाकरांनी उपस्थित महिलांना दिला. - धनश्री क्षीरसागर, जगन्नाथ निवगुणे, कल्पेश सावंत ( स्टार प्रवाहवाहिनीवरील लक्ष्य मालिकेतील कलाकार अनुक्रमे प्रेरणा सरदेसाई, विरेंद्र कदम, मारुती जगदाळे ),सोनसाखळी चोऱ्यांबाबत महिलांनी सतर्क व सजग रहावे. तसेच चोरी झाल्यानंतर त्वरीत १०० क्रमांकावर पोलिसांना फोन लावून सगळी माहिती द्यावी तसेच फुटपाथवरून चालावे. ही चोरी करणारी तरूण मंडळी २०-२५ वयोगटातील असतात. तसेच ते मादक द्रव्याच्या अधिन असतात त्यामुळे त्यांना धक्का दिल्यास ते खाली पडतात व पोलिसांना पकडण्यास सोपे जाते. लोकमतने चालू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या चळवळींतर्गत स्त्रियांना सतर्क करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजाच्या दृष्टिकोनातून प्रभावी आहे. - नागेश लोहार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषन विभाग, ठाणे