शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून कोपरीत गुंडावर दोघा भावांनी केले चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:52 IST

पूर्ववैमनस्यातून दारुच्या नशेत दीपक उर्फ दीपू रेवणकर या गुंडाच्या पोटात चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर भागात घडली. या हल्ल्यानंतर दोघांनीही पलायन केले आहे.

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हल्ल्यानंतर दोघांचेही पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडावर कोपरीतील सिद्धार्थनगर भागात दोन भावांनी पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरीतील सिद्धार्थनगर भागातून २२ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास रेवणकर हा जात होता. त्यावेळी त्याचा विशाल चेकालिया (२०) आणि विकास चेकालिया (१७) या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्याचवेळी विशालने रेवणकर याच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळयात खाली कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या भावाने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही भावांनी जुना वाद उकरुन त्याच्याशी भांडणे केल्याचा आरोप आहे. तर रेवणकर याच्यावरही कोपरी पोलीस ठाण्यात याआधी हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या हल्ल्यानंतर विकास आणि विशाल हे दोघेही पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सांगितले. जमादार तुकाराम डुंबरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून