शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; म्हणते, ‘सीसीटीव्ही’ दुरुस्ती पेलवेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:21 IST

२५ लाखांचा निधी नाही : भिस्त पोलिसांच्या ६ हजार कॅमेऱ्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने विविध माध्यमांतून शहरात १,७३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; परंतु आता कॅमेऱ्यांची निगा आणि देखभाल करणे पालिकेला शक्य नसल्याने मार्च महिन्यात ३०० कॅमेरे बंद पडले. आता आणखी ११३ कॅमेरे बंद पडले. कॅमेऱ्यांची दुरुस्ती, नवे कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे निधीच नाही. दुरुस्तीसाठी लागणारा २५ लाखांचा निधी खर्च करायला पालिका तयार नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून नव्याने लावण्यात येणाऱ्या सहा हजार कॅमेऱ्यांमध्ये हे बंद पडलेले कॅमेरे बदलून मिळावे, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली. 

पालिका हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने पालिकेने ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात १,७३०  सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जाते.  मात्र दुरुस्तीअभावी यातील अनेक कॅमेरे बंद पडले आहेत.

पालिकेची आर्थिक स्थिती नाजूकमार्चमध्ये आयुक्त सौरभ राव यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेतला असता, ३०० हून अधिक कॅमेरे बंद असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. कॅमेरे काही प्रमाणात दुरुस्त केल्याचा दावा संबंधित विभागाने केला. त्यानंतरही आता शहरातील ११३ कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसविण्याचा खर्च तर अशक्य आहे. दुरुस्ती आणि काही ठिकाणी कॅमेरे बदलणे याचा खर्च २५ लाखांच्या आसपास आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा खर्च पालिकेला करता येणे शक्य नसल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘त्या’ विनंतीला पोलिस अनुमती देणार का?दुसरीकडे, यावर उपाय म्हणून पालिकेने एक शक्कल लढविली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात उच्च दर्जाचे तब्बल सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. पालिकेने पोलिसांना पत्र धाडले असून, पालिका हद्दीत ज्या ठिकाणी कॅमेरे बंद पडले आहेत, त्या ठिकाणी पोलिसांनी कॅमेरे बसवावेत, अशी विनंती केल्याची माहिती आहे. पोलिस प्रशासन त्याला अनुमती देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका