शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:22 IST

ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. 

ठाणे महापालिकेत बहुमत मिळालेल्या महायुतीने अखेर आपले पत्ते उघडले. कोणाचा महापौर बसणार आणि उपमहापौर पद कोणाला मिळणार, याबद्दल आता चित्र स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेकडून महापौर पदासाठी, तर भाजपाकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 
  
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिंदेसेनेकडून एक तर उपमहापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका सचिव मनीष जोशी  यांनी दिली.  

शिंदेसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आज (३० जानेवारी) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाचे गटनेते, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

महापौर व उपमहापौर पदांसाठीची ‍निवडणूक प्रक्रिया ३ फेब्रुवारी २००२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. 

या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Mayor from Shinde Sena, Deputy Mayor from BJP.

Web Summary : Shinde Sena's candidate nominated for Thane Mayor, BJP for Deputy Mayor. Election on February 3rd. Senior leaders attended the nomination event.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा