शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राद्वारे भात लागवडीसाठी ठाणे जिल्हा सज्ज

By admin | Updated: June 8, 2015 04:44 IST

यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेभात हे खरीप हंगामातील कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरातील चिखलात पारंपारिक पद्धतीने भातपिकाचे रोपण मजुरांकडून केले जाते. पण, यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात या खरीप हंगामात पहिल्यांदा यंत्राद्वारे भाताची लागवड केली जाणार आहे. यासाठी शहापूर व भिवंडी तालुक्यांची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील या दोन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर भातरोवणी यंत्राद्वारे लागवड केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाखाली १० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. एका यंत्राच्या खरेदीसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे. यानुसार, सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या या यंत्रांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेची मदत घेतल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले. मजुरांऐवजी ‘भातरोवणी’ यंत्राद्वारे या वर्षापासून भात लागवडीला प्रारंभ होणार आहे. याआधी केवळ आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत या यंत्राद्वारे लागवड केली जात असे. पण, आता राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर या यंत्रांची खरेदी करून दिली आहे.