शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधितांवर होणार घरातच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 01:44 IST

एकीकडे ठाणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याप्रमाणात रुग्णालय आणि त्यातील खाटांची संख्या मात्र अपूरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधितांवर सोय असल्यास त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देठाणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णयवाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिकेने घेतला केंद्रीय नियमावलीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात रोज कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता यापुढे कोणतीही लक्षणे नसणाऱ्यांवर त्यांच्या घरातच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भार काही प्रमाणात हलका होणार असला तरी दाटीवाटीच्या वस्तीमध्ये मात्र अशा उपचारांना मर्यादा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, मुंब्रा, मानपाडा, लोकमान्यनगर आणि नौपाडा या प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २२ मे रोजी एकाच दिवशी १९७ रुग्णांची यात भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सध्या शहरात तीन हजार खाटांची निर्मिती करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासनाकडून दहा हजार खाटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे ८५ टक्के रुग्णांमध्ये खोकला, ताप, सर्दी अशी कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांच्या तपासणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. अशा रुग्णांना जर त्यांचा स्वत:चा बंगला अथवा दोन बेड रुमचा फ्लॅट असेल तर त्यांच्यावर घरातच उपचाराचे नियोजन केले जात आहे. ज्या रुग्णांना लक्षणांसह जास्त प्रमाणात त्रास असेल त्यांना शक्यतो रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढती रुग्णसंख्या आणि त्याप्रमाणात अपुरी पडणारी रुग्णालये यासाठीही या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी होणार आहे. परंतू, दाटीवाटीच्या वस्ती तसेच झोपडपट्टी परिसरातील वाढत्या रुग्णांवर ही उपचार पद्धती लागू करण्यात अनेक अडचणी असल्याचे एका वैद्यकीय अधिका-याने सांगितले. त्यामुळे वागळे इस्टेट, मुंब्रा, लोकमान्यनगर, रायलादेवी आणि मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रातील अशा रुग्णांवर पालिका प्रशासन कशा प्रकारे उपचार करणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.........................अशी आहे रुग्णांची स्थितीठाणे महापालिका क्षेत्रात २३ मे अखेरपर्यंत १८९१ रुग्णांची नोंद झाली. यात ६५ जणांचा मृत्यु झाला असून ५८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

---------------------------- 

‘‘ ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १९०० रुग्णांची नोंद झाली आहे. रोज १०० ते १५० रुग्णांची यात भर पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या नविन मार्गदर्शक तत्वानुसार ज्या ८५ टक्के रुग्णांना लक्षणे आणि त्रासही नाही, अशांवर सोय असल्यास घरातच उपचार केले जाणार आहेत. मुळात, कोरोना झाल्यानंतर त्याच्यापासून अन्य कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य सेतू डाऊनलोड करुन त्यानुसार हे उपचार केले जातील. पण ज्याला जास्त त्रास असेल त्यांना मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.’’अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस