शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: May 13, 2017 00:52 IST

गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आणि येथील दुकानांचे गाळे तोडल्यानंतर शुक्रवारी स्टेशन परिसर, सॅटीस, गोखले रोड

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आणि येथील दुकानांचे गाळे तोडल्यानंतर शुक्रवारी स्टेशन परिसर, सॅटीस, गोखले रोड आणि गावदेवी परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. परंतु, रिक्षाचालकांची मुजोरी मात्र शुक्रवारी पुन्हा पाहावयास मिळाली.बुधवारी संध्याकाळी गावदेवी परिसरात कारवाई करायला गेलेले महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाल्यानंतर याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनेच माळवी यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला असून तो प्रशासनावरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी येथील दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस व पूर्वसूचना न देता २७ दुकानांवर पालिकेने बेछूट हातोडा टाकला. त्यानंतर, त्यांनी गावदेवी, स्टेशन परिसर, सॅटीस, जांभळीनाका असा दौरा केला. या वेळी त्यांनी मुजोर रिक्षाचालकांना प्रसाद दिला. दरम्यान, स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरण केल्यानंतर या भागातून टीएमटी आणि एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. असे असतानादेखील या भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले होते. वारंवार कारवाई करूनही ते पुन्हा जैसे थे असेच दिसून आले. फेरीवाल्यांविरोधात व्यापाऱ्यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानंतर, या भागातील अतिक्रमण विभागाची गस्त वाढवली होती. तसेच या भागावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहील, असेही सांगण्यात आले होते. परंतु, हा कॅमेरा काही लागलाच नाही. त्यात फेरीवाल्यांच्या वाढत्या प्रस्थाविरोधात आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, या उद्देशाने स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी पालिकेला खुले आव्हान देऊन फेरीवाले हटवा एक लाखाचे बक्षीस मिळवा, असे जाहीर केले होते. त्यानंतर, पालिकेने ही कारवाई अतिशय तीव्र करून येथील फेरीवाले हटवण्यास सुरुवात केली. आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरल्याने आता या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु, स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी मुजोरी मात्र अद्यापही कमी झालेली नाही. गुरुवारी पालिका आयुक्तांची या भागात कारवाई सुरू असताना छायाचित्रणासाठी गेलेल्या काही छायाचित्रकारांवर धाव घेऊन त्यांनी शिवीगाळही केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या मुजोर रिक्षाचालकांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. दुसरीकडे शुक्रवारी फेरीवाले तुरळक दिसत होते. मुजोर रिक्षाचालक मात्र पुन्हा आपले बस्तान मांडून होते.