उल्हासनगर : किडनी प्रत्यारोपण प्रकरणी एका व्यक्तीची ३१ लाख ६७ हजारांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉक्टरसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या सातही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत चिंचपाडा येथे राहणाऱ्या दीपाली आनंद चव्हाण यांच्या पतीची एक किडनी खराब झाली होती. त्यांनी स्वतःची एक किडनी पतीला दान केली; पण दुसरी किडनीही खराब झाल्याची माहिती उपचारांवेळी डॉक्टरांनी त्यांना दिली. त्यामुळे पतीच्या किडनी प्रत्यारोपणासाठी डोनर मिळविणे, प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून देतो असे आमिष मोसमी जयदेव बिस्वास, जयदेव बिस्वास, सुमानता पांडे, इक्बाल अहमद मोहमद सिद्दिकी जहागीर खान, अभिषेक मन्ना, मोहमद शोएब मोहमद अब्बास अन्सारी व डॉ. गौरव धर्मा नायर यांनी दाखविले.
३१.६७ लाखांची लूट
पतीच्या उपचारासाठी तसेच किडनी डोनरला पैसे देण्यासाठी दीपाली यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यांनी २ जुलै २०२५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान एकूण ३१ लाख ६७ हजार ८६० रुपये रक्कम ही रोख व ऑनलाइन स्वरूपात दिली.
तसेच दीपाली यांच्या पतीला ओडिशा येथील रुग्णालयातही नेण्यात आले होते. चिंचपाडा येथील समर्थ क्लिनिकचे डॉ. नायर यांच्यासह सात जणांनी ३१ लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळूनही, पतीचे किडनी प्रत्यारोपण केले नाही.
Web Summary : In Ulhasnagar, a woman was defrauded of ₹31.67 lakhs under the guise of a kidney transplant. Police have arrested seven suspects, including a doctor, who allegedly took money without performing the surgery. The investigation is ongoing, focusing on the fraudulent scheme.
Web Summary : उल्हासनगर में, एक महिला से गुर्दा प्रत्यारोपण के बहाने ₹31.67 लाख की धोखाधड़ी हुई। पुलिस ने एक डॉक्टर सहित सात संदिग्धों को गिरफ्तार किया है, जिन पर सर्जरी किए बिना पैसे लेने का आरोप है। धोखाधड़ी योजना पर ध्यान केंद्रित करते हुए जांच जारी है।