मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांची धडपड; माध्यमिक शाळांचे सव्वादोन लाख विद्यार्थी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 11:48 PM2020-07-12T23:48:32+5:302020-07-12T23:49:04+5:30

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात जवळपास साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

Student struggles for mobile networks; Twenty-two lakh secondary school students deprived | मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांची धडपड; माध्यमिक शाळांचे सव्वादोन लाख विद्यार्थी वंचित

मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांची धडपड; माध्यमिक शाळांचे सव्वादोन लाख विद्यार्थी वंचित

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांतील बहुतांश शाळांनी लॉकडाऊनमुळे आॅनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील एक हजार ६00 माध्यमिक शाळांमधील सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल दोन लाख २१ हजार विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांऐवजी मोबाइल नेटवर्कची रेेंज मिळणाऱ्या जागेचा शोध प्राधान्याने घ्यावा लागत आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात जवळपास साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्यानंतर आॅनलाइन शिक्षणपद्धतीवर भर देऊन प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह केला जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व खाजगी व मोठ्या शाळांनी आणि त्याखालोखाल अन्यही शाळांनी आता आॅनलाइन धडे देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या एकूण सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांपैकी ज्यांच्याकडे केवळ रेडिओ आहे, असे दोन लाख विद्यार्थी आणि ज्यांच्याकडे एकही साधन नाही, असे २१ हजार विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणाला मुकत असल्याचे वास्तव आहे. या समस्येकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अन्यथा, या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षणास मुकावे लागण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा असणाऱ्यांपैकी सहा लाख विद्यार्थ्यांकडे टीव्ही आहे. पालकांचा मोबाइल वापरणारे चार लाख विद्यार्थी आहेत. केवळ रेडिओची सुविधा असणारे दोन लाख विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी चाचपडत आहेत.
या माध्यमिक शाळांमधील २१ हजार विद्यार्थ्यांकडे कोणतीही सुविधा नसल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ एक प्रकारे सत्त्वपरीक्षा घेणाराच आहे. काहींकडे आॅनलाइन शिक्षणासाठी प्राथमिक सुविधा असली, तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मोबाइलला रेंज मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना उंच टेकडी किंवा पठाराची जागा शोधावी लागत आहे. आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडताना या सर्व अडचणींचा कोणत्याच स्तरावर विचार झालेला दिसत नाही. आॅनलाइन शिक्षण हा वेळकाढूपणा न ठरता त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली
जिल्ह्यातील
2,947
प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील
9,06,351
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे.
यातील माध्यमिक शाळांच्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या
1,331
प्राथमिक शाळांमधील
81,351
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य रामभरोसेच आहे.
यावर उपाय म्हणून बहुतांश विद्यार्थी मोबाइल असलेल्या विद्यार्थ्यांकडे एकत्र येत आहेत. गावात कुठे रेंज मिळते, त्या जागेच्या शोधात हे विद्यार्थी फिरताना आढळत आहे. रेंज मिळणाºया जागेत एकत्र येणाºया या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पाठवलेले आॅनलाइन धडे शिकण्यासाठी गावातील सुशिक्षित विद्यार्थी मदत करीत आहेत. या सर्व गोंधळात लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत आहे.

Web Title: Student struggles for mobile networks; Twenty-two lakh secondary school students deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.