शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई होणार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खरमरीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 5:00 PM

Jitendra Awhad News: मीरा भाईंदर मध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल . त्यासाठी कागदपत्रे गोळा होत आहेत . शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल . त्यासाठी कागदपत्रे गोळा होत आहेत . शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव घेऊन तर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली . 

मीरारोडच्या नया नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍड. सना देशमुख यांच्या कार्यालयासह अन्य कार्यालयांच्या उदघाटना साठी आव्हाड रविवारी सायंकाळी आले होते . यावेळी जाहीर सभेत आव्हाड म्हणाले कि , मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती . त्यावेळी गणेश नाईक बघायचे कि, माझा शहरात प्रवेश नको . नाईकांच्या ध्रुवकिशोर पाटील व प्रकाश दुबोले यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हाच आपण पक्षाच्या नेत्यांना सावध केले होते कि हे नाईक यांच्या शिवाय होऊ शकत नाही . ते ऐकले नाही आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले . 

शहरात महापौर, आयुक्त , स्थायी समिती सभापती यांचे नाही तर नरेंद्र मेहतांचीच चालते . अमेरिकेत ९११ आणि मीरा भाईंदरमध्ये मेहतांची ७११ आहे .  कांदळवन, दलदल बाजूला ठेऊन फाईव्ह स्टार क्लबची परवानगी कोणत्या कायद्या खाली दिली ते आज पर्यत कळले नाही . विधानसभेत पहिल्यांदा मी विषय काढला होता. 

ह्याचे जे काळे धंदे आहेत ते बंद करण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे . सरकारची चौकशी सुरु आहे आणि लवकरच कळेल काय कारवाई होईल ती. शहरातील लुटमारीवर कठोर कारवाई होणार , त्याची कागदपत्रे जमा होत आहेत . मनपा मुख्यालयाच्या आड  ५०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करून त्यावर पांघरून घालायचे होते .  त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी गडबडीची माहिती दिली . 

७ वर्षात मेहता ला जे पाहिजे होते तसे त्यांनी केले . एका सोसायटीची जागा सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला . रहिवाशी माझ्या कडे आल्या नंतर कायदेशीर लढाई लढली.  तुमच्या समोर तुमचे रस्ते, पाणी विकले जातेय, अनधिकृत इमारती व झोपड्या बांधून विकल्या जात आहेत. लोकांनी परिवर्तन आणले पाहिजे . आज ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी हा पर्याय आहे असे आव्हाड म्हणाले . 

मेहतानी शहराचे मालक बनून जे नुकसान केले आहे त्याच्या विरुद्ध बोलले पाहिजे. मेहताला हटवण्यासाठी महाविकास आघाडी बनली पाहिजे. महाविकास आघाडी बनली तर भाजपला पराभवाची धूळ चारू. एकीकडे मेहता तर दुसरीकडे सुलतान ए नया नगर अशी टीका आव्हाड यांनी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचे नाव न घेता केली . ह्या दोघांची सल्तनत खालसा करायची आहे . 

नेताजी बसले आहेत आणि शिपाई नगरसेवकांना सांगतो कि , नेत्यास भेटायचे कि नाही . लाईन लावायची पध्द्त बंद करा . जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे तिकडे होते, ऐनवेळी आम्हाला सोडून गेले . तिकडे चिठ्ठी देऊन कंटाळले  आणि परत आले असा चिंता आव्हाड यांनी हुसेन सह मालुसरेना काढला . 

नया नगर मधील सर्व १२ जागा सर्वांचे बारा वाजवून मिळवा असे सांगतानाच आपण काँग्रेस व शिवसेना विरुद्ध बोललो नाही , पण नेत्याच्या विरुद्ध बोललो. शहरात पाणी , रस्ते , झोडपडपट्टी , जुन्या इमारती आदींच्या समस्या गंभीर आहेत . एसआरए, क्लस्टर , म्हाडा साथीच्या योजनाना मंजुरी देऊ . २००९ चे मुंब्रा आणि आताचे मुंब्रा बघा - चेहरा मोहरा बदलला आहे. जात - धर्म बाजूला ठेऊन विकास करा , पक्ष पाहू नका असे आमचे नेते सांगतात . येणाऱ्यांचे दुःख दूर करण्याचे , अश्रू पुसण्याचे काम करा. 

निवडणुकीत पराभवाच्या भीतीने शेतकरी विरोधी कायदे रद्द  उत्तर प्रदेश , पंजाब राज्यातील निवडणुकीत मोठा पराभव होईल व पुढे देशात सुद्धा पराभव होईल म्हणून शेतकरी विरोधी ३ कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परत घेतले . त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा अजिबात नाही . कारण शेतकऱ्यांच्या लढ्याला नक्षली  पासून अतिरेकी पर्यंत हिणवले गेले . परदेशातून पैसे येतो सांगितले . परंतु शेतकऱ्यांनी देशाच्या हिताचा विचार करून ३६० दिवसांचा लढा दिला . यात ७०० शेतकरी शहिद झाले . जालियनवाला बाग मध्ये जशा गोळ्या घातल्या त्याच प्रकारे मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांवर अश्रूधूर , पाण्याचा मारा केला . मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडले असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला . 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेस