शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसचे चाक थांबले, डिझेल टाकायला पैसे नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:27 IST

वाड्यात वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय

- वसंत भोईर वाडा : गाव तिथे एसटी असे ब्रीद असलेली एसटी ही सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन ठरलेली आहे; मात्र विविध कारणांनी आधीच संकटात असलेली एसटी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. दरम्यान, वाडा आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. वाडा आगारातून दररोज तालुक्याच्या ग्रामीण भागात बसच्या १२५ फेऱ्या तर शहरी भागात १०० च्या वर फेऱ्या मारल्या जातात. यातून प्रवाशांची ने-आण केली जाते. ग्रामीण भागात एसटी बसशिवाय पर्याय नसल्याने प्रवासी बसवरच अवलंबून असतात. कमी पैशांत बस आपल्या नियोजित स्थळी पोहोचवते. मात्र गुरुवारी सकाळी वाडा एसटी आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने १० वाजल्यापासून संपूर्ण बस बंद असून आगारात उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली आहे. कोरोनामुळे ओढवले आर्थिक संकट गेले वर्षभर राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही कोरोनाचे संकट असल्याने हे वर्ष आर्थिक तोट्याचेच गेले; मात्र अलीकडे एसटीचे चाक पुन्हा रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे एसटीवर आणखी आर्थिक संकट ओढवणार आहे.  मुरबाड, शहापूर, कल्याणपाठोपाठ वाडा आगाराचाही डिझेल साठा संपल्याने बस आगारात उभ्या आहेत. वाडा आगाराला डिझेलचा साठा वाशी येथून पुरवला जातो. डिझेल संपल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडे कळवण्यात आले आहे.     - मधुकर धांगडा, आगारप्रमुख, वाडा आगार

टॅग्स :state transportएसटी