शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

विकेंड लॉकडाऊनला ठाण्यात रविवारीही उत्स्फुुर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 10:42 PM

राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. ठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरु होती. प्रवासीच नसल्यामुळे टीएमटीच्या ५० टक्के फेºया रविवारी कमी केल्या होत्या. मात्र, या वाहतूकीवर कोणताही परिणाम जाणवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देदुकाने कडकडीत बंद पोलिसांसह राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. काही ठिकाणी मेडिकलच्या आडून भलत्याच सामानांची विक्री सुरु असल्यामुळे त्याठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘बे्रक द चेन’ अंतर्गत ठाण्यातही शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने तसेच आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवरही पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. पोलिसांकडून कारवाई होण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तावर नसतांनाही नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याचे पहायला मिळत आहे. काही तुरळक ठिकाणी मात्र अनावश्यकपणे नागरिक रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले. जांभळी नाका, टेंभी नाका त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ, इंदिरानगर आणि कळवा मार्केट याठिकाणी एरव्ही गर्दी पहायला मिळते. रविवारी मात्र, याठिकाणी लॉकडाऊनचे पालन झाल्याचे पहायला मिळाले. दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे मार्केट परिसरात शुकशुकाट होता. स्टेशन रोड परिसरातही मुख्य भाजी मंडई, धान्य मार्केट बंद होते. अशीच परिस्थिती शास्त्रीनगर, वर्तकनगर आणि वसंतविहार या भागात होती. पोलिसांनीही बॅरीकेट्स लावून अनेक भागातील रस्ते बंद केले होते. नेहमी गजबजलेला मासुंदा तलाव, चिंतामणी चौक, मानपाडा आणि हिरानंदानी इस्टेट या परिसरातही शांततेचे वातावरण होते.* विनाकारण फिरणाºयांची बंदोबस्तावरील पोलिसांकडून कापूरबावडी नाका, माजीवडा नाका, नितीन कंपनी, तीन हात नाका आणि कळवा नाका आदी भागांमध्ये चौकशी केली जात होती. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाºयांना मात्र समज देऊन पुन्हा घरी पाठविले जात होते.* शनिवार आणि रविवारी केवळ औषध विक्रीची दुकाने सुरु असल्यामुळे कासारवडवली भागात एका मेडिकलच्या दुकानात चक्क इतर सामानाची विक्री केली जात असल्याचे आढळले. त्यामुळे या विक्रेत्याला कलम १८८ अंतर्गत नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.* वाहतूक मात्र सुरुठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरु होती. प्रवासीच नसल्यामुळे टीएमटीच्या ५० टक्के फेºया रविवारी कमी केल्या होत्या. मात्र, या वाहतूकीवर कोणताही परिणाम जाणवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दूध, भाजी, मांसाहारी पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सकाळी आणि सायंकाळी काही काळ सुरु होती.

 

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस